🌹🌷🌼 *_भवतु सब्ब मङ्गलं_* 🌷🌹🙏🏽
*_काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी माझा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा दाखविली आणि त्या समारंभास मी हजर राहावे असे सांगितले. परंतु त्या गोष्टीस मी कबूली दिली नाही. त्यामुळे मी गैरहजर राहिल्याने पुष्कळांची निराशा झाली असेल. मात्र त्यामुळे मला वाईट वाटले नाही. कारण माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचा वाढदिवस साजरा करून कोणता फायदा मिळणार ? तुमच्यापेक्षा माझ्यामध्ये विशेष असे काय आहे ? माझ्यापेक्षा तुमच्यामध्ये कमी माणुसकी आहे काय ? मला तसे मुळीच वाटत नाही. काही माणसांना आपले वाढदिवस साजरे झालेले आवडत असतील, माझा वाढदिवस साजरा झालेला मला आवडत नाही. म्हणून मी त्या तरुणांना भगवान बुद्धाचा वाढदिवस साजरा करण्यास सांगितले आणि म्हणूनच माझी सर्व कामे बाजूला सारून मी आलो आहे._*
🌷🙏🏽🌹🌷🙏🏽🌹🌼🌷🙏🏽🌹🌼
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_82.html
*_संदर्भ :- २६६ - बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान (पान नंबर २००, डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८, भाग ३)_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०६/०४/२०२४_*
🌹🌷🌼 *_ॐ मणी पद्मे हुं_* 🌷🌹🙏🏽
No comments:
Post a Comment