🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_दिवाळी बौद्धांचा सण....?_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post_2.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_६८ वर्षे झाली बाबासाहेबांनी आपल्याला धम्म देवून. पण एवढ्या वर्षात आम्हाला बौध्द धर्माचे सण उत्सव काय होते हे प्रमाणित करता आलेले नाहीत. यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल. मानव हा उत्सवप्रिय आहे. सण उत्सव यांच्याशिवाय त्याचे जगणे म्हणजे वाळवंटात रखरखत्या उन्हात जीवन व्यतीत करणे आहे. *मग प्रश्न असा आहे की बौद्ध काळापासून बौद्धांचे काहीच उत्सव होते का नव्हते?*_
_दिवाळीच काय.... पण अजून काही बौद्धांचे सण आहेत का म्हणून लहान मुलं प्रश्न विचारत असतांना आई वडिलांना त्याचे उत्तर आजही देता येत नाही. आपण दिवाळी साजरी करायची नाही कारण तो तर हिंदूंचा सण आहे म्हणून आम्ही लेबल लावून मोकळे झालोय हे समजून घेणे आवश्यक आहे. *दिवाळी हा सण विशिष्ट धर्माचा होता असा लिखित पुरावा कुठेही नाही. दुसरी महत्वाची बाब या कालखंडात बौध्द धर्मीय लोकांमध्ये कोणत्या घटना घडल्याच नव्हत्या का?* बौद्धांचा इतिहास बौद्धांनाच आज माहिती नाही._
_*दिवाळीच्या दिवशी बौध्द लेण्यात दिव्यांची आरास लावली जात होती हे जेंव्हा आपण बौद्ध लेण्यांचा अभ्यास करायला लागू तेंव्हा आपल्याला नेमका इतिहास अभ्यासायला मिळतो, त्यावेळची समाज व्यवस्था, रीत- रिवाज पाहायला मिळतो.*_
👉 *_साधारण इसवी सन १०० ते ६०० या कालखंडात लेण्यामध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान कसे होते यावर जर आपण प्रकाश टाकला तर याचे उत्तर नक्की मिळते. बॉम्बे प्रेसिडेन्सी च्या खंड १४ मध्ये पान नं १४५ वर दिवाळी चा उल्लेख आहे आणि याकाळात कान्हेरी लेणी वर दिवे लावले जात होते असा उल्लेख सापडतो. एकूण सांगायचे झाले तर दिवाळी हा काही विशिष्ट धर्माचा सण नाही तो खऱ्या अर्थाने निसर्गपूजक लोकांनी निर्माण केलेला उत्सव आहे._*
👉 _*कालांतराने त्यात प्रतिक्रांती झाली आणि हा सण इतर धर्मियांनी आपलासा केला... हे जरी असले तरी दिवाळी हि कान्हेरी लेणी मध्ये साजरी होत असेल तर तो सण बौद्धांचा नक्कीच आहे यात शंका नाही. आणि दिवे लावण्याची बौध्द परंपरा आहेच, मग तो बुद्ध मूर्ती पुढे देखील लावला जात असे आणि त्यासाठी अनुदान दिल्याचे शिलालेख देखील आहेत.*_
👉 _*आजही जे जे लेण्यांवर अभ्यास करतात, त्यांचे संवर्धन करतात असे बरेच समूह ह्या दिवसांत आपल्या समाजाला ह्या दिवसाचे महत्व लक्षात राहावे म्हणून लेण्यांवर दिपदानोत्सव साजरा करतात.*_
👉 _बौध्द संस्कृतीनुसार तुम्ही दिवाळी कशी साजरी करायची ह्यासाठी बौध्द संस्कृती प्रथम स्वतः आपल्याला त्याची माहिती असायला हवी, *आमच्या लोकांनी संशोधक वर्ग उभा करून बौध्द संस्कृतीचे सण उत्सव शोधले पाहिजेत.* आम्ही आमचा नेमका इतिहास विसरून विहारात इतर महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवत आहोत. जो वेळ बौध्द संस्कृतीचे महान नायक यांना शोधण्यात अभ्यासण्यात वापरला गेला असता... *पण ह्या व्हॉट्सपच्या विद्यापीठात कॉपी पेस्टचे आयुष्य जगत असताना आम्हाला नवीन संशोधन करायचं नाही, नवीन काही अभ्यासायचे नाही पण ह्या अश्या करण्याने बौध्द संस्कृतीचे महान नायक आम्ही विसरून गेलो त्याचे काय ?*_
_दिवाळीत आम्हांला बळीराजा आठवतो काय तर म्हणे शेतकऱ्याचा राजा. बळीवंश अभ्यासण्यात आम्ही धन्यता मानतो पण आमच्या हातात..._
१. *सातवाहन वंश आहे का?*
२. *मौर्य वंश आहे का?*
३. *कुशाण वंश आहे का?*
४. *वाकाटक वंश आहे का?*
५. *दिवाळीच्या काळात सम्राट अशोक आठवले पाहिजेत पण आम्हाला ते आठवत नाहीत.*
_असे किती तरी नाव घेता येतील. आमच्या डोक्यात भरला गेलाय तो द्वेष भाव. यामुळे आम्ही आमचा इतिहास विसरून गेलोय._
_इथे एक गोष्ट अजून सांगायची आहे ती म्हणजे काही लोक *दिवाळी बौद्धांनी का साजरी करू नये, तर महामोगल्लान यांची हत्या झाली म्हणून आपण दिवाळी साजरी करू नये.*
_महामोग्गल्लान थेर यांचा मृत्यू कसा झाला याचा लिखित पुरावा त्रिपिटकात आपल्या सापडतो ... तो पुढील प्रमाणे :-_
_सुत्तपिटक 👉🏾 धम्मपद 👉🏾 १० दण्डवग्गो मधील गाथा क्रमांक १३७, १३८, १३८, १४० या गाथा विस्तृतपणे समजण्यासाठी खालीलप्रमाणे 👉_
*_सूत्तपिटक अट्ठकथा 👉🏾 धम्मपद अट्ठकथा 👉🏾 १० दण्डवग्गो 👉🏾 ७ महामोग्गल्लानथेरवत्थु_*
_या अट्ठकथेचा ज्यांनी अभ्यास केला ते असे कधीच म्हणू शकत नाही की *ही हत्या ब्राह्मणांनी करून त्यांच्या कवटीत तेल टाकून दिवाळी सण सुरू करण्यात आला.*_
*_महामोग्गल्लाथेर यांची हत्या आणि दिवाळी यांचा काहीही संबंध येत नाही, हे आपण वरील उदाहरणांवरून सिद्ध करू शकतो_*
_आपण वर महामोगल्लान यांच्या हत्येचा संदर्भ घेतला.... *बुद्ध महामोगल्लान किंवा सारीपुत्त यांचे परिनिर्वान झाल्यानंतर दुःख करीत नाही बसले, तो एक अनित्य सिद्धांतांचा बोध होता. त्यांनी त्या नंतर ही धम्माचा प्रसार प्रचार करण्याचे काम चालूच ठेवले.*_
_एक उदाहरण घेऊ ६ डिसेंबरला अखंड भारतातून चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायी येत असतात... पण ते दुःख करीत बसत नाही,_
अ) ते अनुयायी केंडल मार्च काढतात,
आ) उपोसथ ठेवतात,
इ) पुस्तके घेऊन एक प्रकारे बाबासाहेबाना मानवंदना देतात,
इ) बाहेरून येणाऱ्या लोकांना भोजन दान ठेवतात की नाही?....
इ) आणि त्या ऊर्जा भूमीवरून ऊर्जा घेऊन, वर्षभराचा संकल्प करतात की मी बाबासाहेबांचे कार्य करीत राहीन._
*_दिवाळीमध्ये काय करू नये..._*
१. _२२ प्रतिज्ञेत सांगितले आहे की, पहिल्या १ ते ५ हिंदू धर्मातील देव देवतांना मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही... आणि ७ वी प्रतिज्ञा.. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही._
_म्हणजे जी काही प्रतिक्रांती झाली आहे त्याविरुद्ध मी कार्य करेन म्हणजेच लक्ष्मी पूजन, घरातले दाग - दागिने, झाडू ई. यांचे पूजन करणार नाही._
२. _प्रतिज्ञा क्रमांक ८ मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही. म्हणजेच या वरील पूजा तर मी करणार नाहीत सोबत त्या करण्यासाठी कोणत्याही ब्राह्मणाला बोलवणार नाही._
३. _इतरांना त्रास होईल असे फटाके फोडणार नाही._
४. _हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी माझ्याकडुन जेवढे होईल तेवढे प्रयत्न मी करेल सोबत इतरांना ही सांगण्याचा मी प्रयत्न करेन._
*_दिवाळीमध्ये काय करावे..._*
१. _बौध्द भिक्खूंना बोलावुन चीवर दान करा आणि दिवाळी साजरी करा._
२. _तुमच्या मुलांमध्ये देखील बौध्द भिक्खू यांच्याबद्दल आदर निर्माण होण्यासाठी दिवाळी साजरी करा कारण एरवी बौध्द भिक्खू तुमच्या घरात येतच नाहीत किंवा तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन त्यांच्याकडे जात नाहीत._
३. _बौध्द भिक्खू आणि उपासक यांच्यात एक दुरी बनलेली आहे. ती मोडीत काढण्यासाठीच हा उत्सव होता._
४. _आमच्या मुलांना दिवाळी हा बौध्द संस्कृतीचा एक सण आहे हे पटवून द्या._
५. _या दिवशी बौध्द भिक्खू एकत्र भेटत असत. (नुकताच वर्षावास संपून भिक्खू संघ धम्म प्रचारासाठी बाहेर पडलेला असे)_
६. _दीप दान उस्तव या शब्दाचा अर्थ काय तर... ह्या दिवसांत अमावस्या असते आणि त्या काळात भिक्खू संघ हा गडद अंधाऱ्या लेण्यांत राहत असत. त्यांना इतर कोणत्याही प्राण्यांपासून ईजा होऊ नये म्हणून उपासक त्यांना दीप दान करीत असे._
७. _सोबत त्या दिवशी उपोसथाचे पालन करीत असे._
_आजही आपण पौर्णिमा, अमावस्या, दोन अष्टमी ह्या दिवसांत उपोसथ ठेवत असतो. शिलांचे पालन करीत असतो._
८. _ज्याप्रमाणे लहान मुलांना दिवाळीत दिवाळीचा अभ्यास असतो तसाच अभ्यास आपण ही करू शकतो आणि बौद्ध संस्कृतीचा अभ्यास मुलांकडून करवून घेऊ शकतो (फक्त तो अभ्यास कोणता असतो हे पालकांना माहीत असावे)..._
९. _ह्या दिवसांत ९०% लोकांना दिवाळीचा बोनस मिळतो. तो बोनस पुस्तके खरेदी करिता, किंवा एखाद्या विद्यार्थ्याची निदान एका महिन्याची शाळेची फी भरण्यासाठी वापरात आणु शकतो._
१०. _त्या काळात आजच्या सारखे दिवे नव्हते म्हणून दीप दान होत होते, आज वीज आहे तर आपल्या जवळच्या भिक्खू संघाला औषधे, त्यांच्या एक महिन्याचे राशन (आज तो उपासक वर्ग राहिला नाही जो संघ जेंव्हा चारीका करायला येत असे तेंव्हा त्यांच्या भोजनव्यवस्थेकडे लक्ष देत असे) ई. देऊ शकतो._
११. _आज बऱ्याच बौद्ध धर्मीय मोनेंस्ट्री काम करीत आहेत, त्यांना विविध प्रकारे आपण मदत करू शकतो_
१२. _बाल संस्कार केंद्र या दिवसांत बऱ्याच ठिकाणी आयोजित केली जातात तिथे आपल्या मुलांना बौद्ध संस्कार मिळावे म्हणून त्यांचा उपयोग करू शकतो_
*_तसे म्हणायला गेले तर ही वर्षभर चालणारी कामे आहेत आणि ती करायलाच हवी. पण आपण दिवाळीच्या दिवसांत अशाही प्रकारे दिवाळी साजरी करून एक आदर्श निर्माण करूच शकतो. त्यासाठी अश्या सणांना नेहमी विरोधच करावा असे काही आहे का?_*
_*लेखाच्या शेवटी बुद्धांनी चार प्रकारचे मनुष्य सांगितले आहेत :-*_
१. *_अंधारातून अंधाराकडे जाणारा_*
२. *_अंधारातून प्रकाशाकडे जाणारा_*
३. *_प्रकाशाकडून आंधराकडे जाणारा_*
४. *_प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा_*
_बुद्ध वरील २ आणि ४ नंबरच्या मनुष्याचे गुणगान गातात. जे आपल्यातील *"राग, मोह, दोष"* या भावनांचा त्याग करून *बुद्धांनी दाखविलेल्या मार्गाकडे जात आहेत... म्हणजेच प्रकाशाकडे जात आहेत.*-
_*आत्ता आपल्याला ठरवायचे आहे की आपल्याला सकारात्मक विचार करून, बुद्धांनी दाखविलेल्या मार्गाचे आचरण करून कोणत्या क्रमांकाचे मनुष्य बनायचे आहे?*_
_शेवटी आपण काय करावे आणि काय करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण मानव प्राणी आहोत, जे संसारात रमतात, त्यांना शेजार धर्म ही आहे. *जर आपण एकमेकांच्या द्वेषात राहिलो, एका धर्माने दुसऱ्या धर्माचा द्वेष करीत राहिलो तर आपण समाजात आनंदी राहू शकतो का? आणि बुद्ध धम्म द्वेष शिकवीत नाही तर मैत्री शिकवितो....*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_लेखन :- महेश हरिश्चंद्र कांबळे_*
*दिनांक :-* ०३/११/२०२४
*_संदर्भ:-_*
१. *बॉम्बे प्रेसिडेन्सी च्या खंड १४ मध्ये पान नं १४५*
🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏
🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment