🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_स्वतःचे दोष पहावे दुसऱ्याचे नव्हे_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_4.html
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_न परेसं विलोमानि न परेसं कताकतं ।_*
*_अत्तनो व अवेक्खेय्य कतानि अकतानि च ॥_*
*_अर्थ - दुसऱ्यांचे दोष आणि त्यांनी केलेले अथवा न केलेले याकडे पाहु नका. मी काय केले व काय केले नाही इकडेच लक्ष द्या._*
_श्रावस्तीमद्ये राहणारी एक गृहणी पाठिक आजीवकास फारच मानत होती. भगवंतांची कीर्ती ऐकून त्यांची मङ्गल वाणी ऐकण्याकरिता ती जेतवनात जाण्याची तिची खूप ईच्छा होती पण आजिवकांनी तिला मनाई केली. दुसऱ्या दिवशी तीने आपल्या मुलाला बुद्धांकडे पाठवून भिक्षुसंघासह त्यांना भोजणाकरिता आमंत्रित केले. तथागत भिक्षुसंघासह वेळेवर आले भोजन स्विकारून दानानुमोदन करण्यास प्रारंभ केला. गृहणी साधु साधु म्हणत उपदेश ऐकत होती. हे पाहून पाठिंबा आजीवकाला रहावले नाही. तो शेजारच्या घरातून येवून गृह - स्वामीनी तसेच तथागतांना बरे-वाईट बोलुन पळून गेला. तथागतांनी जाणले की त्याच्या कृत्याने लज्जीत गृहणी त्यांचा उपदेश योग्य प्रकारे ग्रहण करित नाही, तेव्हा *"उपासिके ! अशा अनमेल व्यक्तींच्या गोष्टीकडे ध्यान देऊ नये, फक्त आपले कृत्याकृत्य पाहिले पाहिजे."* हे समजावुन सांगताना पुढे बुद्धांनी ही गाथा सांगितली._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०४/०४/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) धम्मपद - पुप्फवग्गो*_
_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment