🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*
*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_29.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_भाग १३_*
*_समाप्त_*
*_गरज व्यापक परिवर्तनाची_*
_*हे सगळं एका व्यापक समाजिक परिवर्तनाकडे अंगुलीनिर्देश करतं. या सगळ्यामध्ये बदल होण्याची गरज निश्चितपणे आहे; पण त्यासाठी पहिल्यांदा 'स्त्री आणि अंधश्रद्धा' हा विषय किंवा 'स्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन' हा विषय नीटपणे समजून घेण्याची गरज आहे.* त्यातही अधिक अवघड गोष्ट म्हणजे, ज्या स्त्रीला या अंधश्रद्धेमधन बाहेर काढायचंय, ती असुरक्षित आहे. तिला बहुधा कायमची आर्थिक विवंचना आहे. *तिला एका बाजूला सासरची मानसिकता जोपासावी लागते; वडीलधाऱ्यांचा आदर करावा लागतो; कौटुंबिक प्रेम आणि जिव्हाळा कायम ठेवण्याचं कामही करावं लागतं; आणि ही सगळी तारेवरची कसरत करत असताना पुन्हा स्वतःच्या विवेकाचं स्वत्वही जपावं लागतं. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तयार होणारी भगिनी ही स्वाभाविकचपणे पुरुषांपेक्षा एक अधिक अवघड लढाई लढत असते.* म्हणूनच हा विषय निश्चितपणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्राधान्याचा आणि सहानुभूतीचा आणि या कामामध्ये शक्य असेल, ती सर्व मदत स्त्रीला देण्याचा विषय आहे, असं आम्ही मानतो; याच अंगाने आम्ही या प्रश्नाकडे पाहतो आणि कृतीही करतो._
****
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-०४/०४/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment