Monday, 1 April 2024

इंद्रिय सुखात रमणारास मृत्यू वाहून नेतो

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_इंद्रिय सुखात रमणारास मृत्यू वाहून नेतो_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_1.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पुप्फानि हेव पचिनन्तं व्यासत्तमनसं नरं ।_*

*_सुत्तं गामं महोघोव मच्चु आदाय गच्छति ॥_*

*_अर्थ :- कामभोगरुपी पुष्प वेचणाऱ्या आसक्त माणसाला मृत्यू ओढून घेऊन जातो, जसा निजलेल्या गावाला महापूर ओढून घेऊन जातो._*

              _*कोशल नरेश प्रसेनजिताचा पुत्र विडूडभ जो शाक्यांची दासी वासभखत्तियाचा पुत्र होता.* जेंव्हा विडूडभला सत्य समजले तेंव्हा त्याने शक्य कुळाचा नाश करण्याचे ठरविले त्यासाठी त्यांचा विनाश करण्याकरीता त्याने शाक्यांवर तीनदा चढाई केली, परन्तु तथागतांनी तिन्ही वेळा त्याला मार्गात रोखुन परत पाठविले, परन्तु चौथ्यांदा शाक्यांच्या पूर्व-जन्माच्या कर्म- विपाकास बलवान बघून विडूडभास रोखण्यास गेले नाही. त्याने कपिलवस्तुत जाऊन शाक्यांचा वध करून, शाक्य कुळास उच्छिन्न करून, रात्री अचिरावति नदीच्या पात्रात डेरा टाकला. त्याच्या महापातकी कर्मामुळे अकस्मात अर्ध्या रात्री महापूर आला आणि विडूडभा बरोबर त्याची सेना नदीत वाहुन गेली._

               _भिक्षुंनी ही वार्ता ऐकून एके दिवशी धर्म सभेत ह्याची चर्चा केली तथागतांनी हे ऐकून - *"भिक्षुंनो ! अशा प्राण्यांचे मनोरथ पूर्ण न करताच मृत्यू त्याचप्रमाणे जिवितेन्द्रीयांचा नाश करून चारी अपायरूपी महासमुद्रात बुडवित असतो; जसा झोपलेल्या गावास महापूर"* असे म्हणाले आणि ही गाथा सांगितली._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०१/०४/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - पुप्फवग्गो,_*

_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...