Saturday, 16 March 2024

मार कुणाला पदच्युत करित नाही

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_मार कुणाला पदच्युत करित नाही?_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_69.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सुभानुपरिसं विहरन्तं इन्द्रियेसु असंवुतं ।_*

*_भोजनम्हि अमत्तञ्ञुं कुसीतं हीनवीरियं ।_* 

*_तं वे पसहति मारो वातो रुक्खं व दुब्बलं ॥_*

_*अर्थ -* जो पुरूष रागदृष्टीने वावरतो, जो इन्द्रियांना लगाम लावीत नाही, जो भोजनाची उचीत मात्रा जाणित नाही, जो आळशी व वीर्यहीन आहे अशा पुरूषाला मार त्याच प्रमाणे पदच्युत करतो ज्या प्रमाणे सोसाट्याचा वारा दुर्बल झाडाला._


                    _सेतव्य नावाच्या नगरात राहणारे दोन व्यापारी *'चुलकाल आणि महाकाल'* हे भगवतांजवळ जाऊन प्रव्रजित झाले. ह्या दोघांपैकी महाकाल यांनी प्रव्रजेनंतर थोड्याच दिवसांनी अर्हतपद प्राप्त केले. तर चूलकाल प्रव्रजित होऊनही आपल्या गृहस्थी जीवन आणि काम विलासाच्या गोष्टीच मनात आणून आपला वेळ व्यतित करित होते._

               _एकदा तथागत त्यांच्या सोबत सेतव्य नगरात गेले, तेव्हा चुलकालाच्या स्त्रियांनी त्याला पकडुन श्वेत वस्त्र जबरदस्तीने परिधान करावयास लाविले. दुसऱ्या दिवशी महाकालाच्या स्त्रियांनीही तसेच करण्याचा प्रयत्न केला पण तो आपल्या ऋद्धिबळाने त्यातून बाहेर पडला. भिक्षुंनी या बाबत विचारणा करता तथागत म्हणाले - "भिक्षुंनो ! चुलकाल सदासर्वदा उठता बसता त्याच्या मागील जीवनाचे चिंतन करीत असे ज्याप्रमाणे प्रपात तटावर एखादा दुर्बल वृक्ष परन्तु धम्ममय जीवनाचे चिन्तन करून विहरणारा महाकाल शैल पर्वता समान अचल आहे." असे संबोधुन तथागतांनी ही गाथा म्हटली._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-१७/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - यमकवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...