Sunday, 17 March 2024

काषाय वस्त्राधिकारी

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_काषाय वस्त्राधिकारी_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_17.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अनिक्कसावो कासावं यो वत्थं परिदहेस्सति ।_*

*_अपेतो दमसच्चेन न स कासावमरहति ॥_*

_*अर्थ -* चित्ताचा मळ नष्ट केल्याशिवाय जो काषाय वस्त्र धारण करतो, जो संयमी नाही, सत्य पाळीत नाही, असला पुरुष काषाय वस्त्राचा अधिकारी होऊ शकत नाही._

                   _एकदा राजगृहातील उपासकांनी आयुष्यमान सारिपुत्राचा उपदेश ऐकून प्रभावित होऊन सर्वांनी एकत्र येऊन आपल्याकडे असणारी थोडे थोडे धन का होईना पण एक रक्कम एकत्र करून त्यातून भिक्षु संघास भोजनदान दिले. त्यावेळी एका श्रेष्ठीने त्या एकत्रित केलेल्या रक्कमेत एक खूप महाग मौल्यवान वस्त्र सुद्धा दिले आणि सांगितले, जर तुमच्या रक्कमेतून दान सामुग्री पूर्ण होत नसेल तर हे विकून दान द्यावे आणि होत असेल तर हे वस्त्र तुम्हाला ज्याला द्यावे वाटेल त्याला दानात द्यावे. एकत्रित रक्कमेतून दानाची सामग्री पूर्ण झाली. त्या नंतर *ते वस्त्र जे सारिपुत्राला देण्या योग्य होते ते त्यांना न देता देवदत्तास दिले.* ते त्याने फाडुन ते चिवर करून परिधान करून तो फिरत होता. हे वृत्त एका भिक्षुद्वारे श्रावस्तीत तथागतांना कळले. देवदत्त ह्या वस्त्राचा अधिकार नाही असे संबोधून तथागतांनी ही गाथा म्हटली._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-१८/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - यमकवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...