🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_पाली पाठ_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_5.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! भाग ११ !!_*
*_सूचना :- आपण सर्वांनी "पाली भाषेचा" अभ्यास करावा आणि आपल्या जवळील विद्यापीठात "पाली भाषा" शिकण्यासाठी प्रवेश घ्यावा ह्या उद्देशाने सदर सत्र हे काही मोजकेच भाग (१५) सुरू करण्यात येत आहे._*
अक्खि-(नपू.) नेत्र, नयन, डोळा, अक्ष, चक्षु
अक्खोभिनी-(स्त्री.) अक्षोहिणी, सेना, सैन्यदल, पलटन
अक्खोहिणी - (स्त्री.) संपूर्ण सैन्य, तिन्ही सैन्यदले.
अखात-(नपु.) खड्डा.
अखेत्त -(नपु.) नापिक जमीन, शेतीस अयोग्य क्षेत्र.
अग-(पु.) पर्वत, वृक्ष.
अगति-(स्त्री.) अयोग्य मार्ग, पक्षपात.
अगद- (नपु.) औषधी वनस्पती.
अगभेद-(पु) वृक्ष, औषधी वृक्ष-झाड.
अगरू - (वि.) हलका, कमी वजनाचा.
अगळु -(पु) औपल, काढा, रस, अर्क.
अगाध -(वि.) अती, अतिशय, फार, अत्याधिक.
अगार-(नपू.) घर, गृह, निवासस्थान.
अगारिक-(पु., वि.) गृहस्थ, गृहपति, घरधनी.
अग्ग- (वि) अग्र, टोक, प्रथम, श्रेष्ठतम.
अग्गज-(पु.) अग्रज, वडील बंधू, अगोदर जन्मलेला.
अगञ्ञ-(वि.) सर्वश्रेष्ठ, अग्रगण्य, सर्व प्रथम
अग्गता-(स्त्री.) श्रेष्ठता, बेष्ठता.
अग्गतो- (नपु.) समोर, सन्मुख, पुढे.
अग्गळत्थम्भ - (पु.) अर्गलस्तंभ, खांब, दाराचा अडसर (अरगल).
अग्गल-(नपु.) अरगल, आडणा, दरवाज्याचा अडसर.
अग्गि- (पु) अग्नी, आग, जाळ, आगटी.
अग्गि-जाल-(स्त्री.) रानटी फूल, जंगली फूल.
अग्नि-पूजा-(स्त्री) अग्नीशाळा, स्वयंपाकघर, यज्ञ-शाळा.
अग्गिमन्थ- (नपु.) कर्णिका
अग्घ -(पु.) किंमत ठरवणारा, मूल्य करणार, अर्घ
अग्घति -(क्रि.) किमत ठरवणे, मूल्य करणे.
अग्घिक- (नपु.) फुलमालांनी सजविलेला खांब.
अग्घिय- (नपू.) आतिथ्य पाहुणचार, सत्कार, आदर.
अघ-(नपु.) आकाश, नभ, दुःख, दुर्भाग्य.
अङ्क- (पु.) संख्या, चिन्ह, मांडी.
अङ्कुर-(पु.) अंकुर, कोंब, नवा शेंडा.
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०५/०३/२०२४_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment