🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_पाली पाठ_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_4.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! भाग १० !!_*
*_सूचना :- आपण सर्वांनी "पाली भाषेचा" अभ्यास करावा आणि आपल्या जवळील विद्यापीठात "पाली भाषा" शिकण्यासाठी प्रवेश घ्यावा ह्या उद्देशाने सदर सत्र हे काही मोजकेच भाग (१५) सुरू करण्यात येत आहे._*
अकुसल (नपु.) पापकर्म, दुराचार
अकोविद (वि.) दक्ष नसलेला, अज्ञानी, हुशार नाही.
अक्क (पु.) अर्क, रवि, सूर्य, एक विशेष बनस्पती.
अक्कन्त-(क्रि. वि.) आक्रोश, आकांत, मोठ्याने रडणे.
अक्कन्दति-(कि.) दुःखाने रडणे, ओरडणे, अति दुःख करणे, आक्रंदणे.
अक्कोस-(पु.) आक्रोश, अपमान.
अक्ख-(पु.) अक्ष, नेत्र, डोळा, गाडीचा कणा, जुगारातील फासा.
अक्खक- (ना.) गळ्याचे गोलाकार हाड, गोल दागिना, सरी.
अक्खग्गकील-(स्त्री.) बीळ, जूवरील खीळ, जोखडावरील खीळ,
अक्खण- (पु.) अक्षण, अवेळ, अयोग्य वेळ.
अक्खणवेधी - (पु. व विशे.) क्षणार्धात तीर मारणारा.
अक्खत-(वि.) अक्षय, ज्याचा क्षय-नाश होत नाही, ज्यास क्षती-हानी पोहोचत नाही.
अक्खदस्स-(पु.) न्यायाधीश, न्याय देणारा, निवाडा करणारा.
अक्खदेवी-(पु.) जुगारी, धूर्त.
अक्खधुत्त-(वि.) जुगारी, जुगार खेळणारा, फसवा.
अक्खय-(वि.) अक्षय, अक्षर, लिहिण्याची पाटी, विद्या
अक्खर- (नपु.) अक्षर, विद्या, लिपी.
अक्खरमाला-(स्त्री.) अक्षरमाला, वर्णमाला, पालि व सिहली भाषेच्या वर्णमालेविषणीची काव्य रचना.
अक्खणवेधी - (पु. वि.) क्षणार्धात तीर मारणारा.
अक्खात-(फि.वि.) सांगितले, म्हणाले, व्याख्या केली
अक्खातार-(क्रि. वि.) सांगणारा, शिकविणारा, मार्ग- दर्शक.
अक्खाति-(क्रि.) सांगणे, शिकविणे, ऐकविणे, समजाविणे.
अक्खान-(न.) आख्यान, कथा, गोष्ट.
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०४/०३/२०२४_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment