Sunday, 3 March 2024

पाली पाठ ९

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पाली पाठ_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_3.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! भाग ९  !!_*

अकट-(वि.) अकृत, अनिर्मित, तयार न केलेले.

अकतं- (नपु.) निर्वाण

अकतञ्ञु - (वि.) अकृतज्ञ, उपकार न जाणणारा

अकनिठ्ठदेव-(पु.) पराच पवित्र स्थानापैकी पहिल्या स्थानी राहणारे देवलोक, सर्वश्रेष्ठ देव.

अकम्पिय- (वि.) स्थिर, अचल, न हालणारे.

अकल्लं- (नपु.) रोग, व्याधि.  

अकाच-(वि.) शुद्ध, निर्दोष, दोष रहित.

अकारिय-(वि.) कडू, कटू 

अकामक-(वि.) निरिच्छ, इच्छा नसलेला, अनिच्छुक 

अकाल-(पु.) अवेळ, असमय.

अकासि-(भूत. क्रि.) पूर्वी केलेले, केले.

अकिरिय-(पु.) अक्रियावाद, कोणत्याही कर्माचे कोणतेही फळ मिळत नाही असे मानणारे मत.

अकिञ्चन (वि.) निर्धन, दरिद्री, ज्याचे जवळ काही नाही असा. 

अकिलासु-(वि.) क्रियाशील, अप्रमादि, जागरूक.

अकुटिल-(वि.) सरळ, शुद्ध, सात्विक मनाचा.

 अकुतोभय-(वि.) निर्भय, धीट, कुणाकडून भय नाही असा

अकुप्प-(वि.) स्थिर, अचल, अचंचल, न हालणारा.


*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०३/०३/२०२४_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

योग

*_योग_* _भगवंतांनी संबोधी मार्गातील *दहा संयोजने म्हणजेच बंधने* सांगितली आहेत. ती बंधने तोडून साधक संबोधी प्राप्त करतो._ १.  सत्कायदिट्ठिका ...