🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_मन हेच मुख्य आहे_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_11.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_मनो पुब्बङ्गमा धम्मा मनो सेट्ठा मनोमया_*
*_मनसा चे पदुट्ठेन भासति वा करोति वा ।_*
*_ततो नं दुक्खमन्वेति चक्कं व वहतो पदं ॥_*
_*अर्थ :- मनुष्याच्या सर्व व्यवहारांचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मनःप्रधान, मनोमय आहेत. जर कोणी दुषित मनाने वचन बोलतो किंवा काम करतो, तर दुःख त्याचे अनुसरण तसेच करते जसे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायाचे तिची चाके करतात.*_
_श्रावस्तीतील जेतवनात चक्खुपाल नावाचे एक अंध अर्हत होते. सकाळी ते विहारात फिरत असता त्यांच्या पायाखाली अनेक किटक मारले जात. एके दिवशी काही भिक्षुंनी ही बाब भगवन्ताना सांगितली. *भगवान म्हणाले भिक्षुनों ! चक्खुपाल अर्हत भिक्षु आहे, अर्हताला जीवहिंसा करण्याची चेतना होत नसते.* तेव्हा त्या भिक्षुंनी तथागतांना विचारले, भन्ते ! अर्हत प्राप्ति करीता पूर्व आयुष्यात पुण्य केले असुन सुद्धा चक्खुपाल अन्ध का झाले ? *तथागत म्हणाले मागील आयुष्यी ते भिक्षु वैद्य होते. त्यावेळी त्यांनी दुष्ट हेतुने एका स्त्रीला घातक औषध देऊन तीची दृष्टी घालविली. ते पापकर्म तेव्हापासुन चक्खुपालांचा पाठलाग करीत आहे,* त्याने ह्या वेळी ह्या आयुष्यात त्याचे फळ दिले. *जसे गाडीला जुम्पलेल्या बैलांचा पाठलाग चाके करतात त्याच प्रमाणे व्यक्तिने केलेले पापकर्म आपले फळ देण्याच्या वेळेपर्यन्त त्याचा पाठलाग करीत असते. इतके सांगुन उपदेश करतांना तथागतांनी ही गाथा सांगितली.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-११/०३/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) धम्मपद - यमकवग्ग*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment