🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_मन हेच मुख्य आहे - २_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/2.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_मनो पुब्बङ्गमा धम्मा मनो सेट्ठा मनोमया_*
*_मनसा चे पसन्नेन भासति वा करोति वा।_*
*_ततो नं सुक्खमन्वेति छाया व अनपायिनी॥_*
*_अर्थ -: मनुष्याच्या सर्व व्यवहारांचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मनःप्रधान मनोमय आहेत. जर कोणी प्रसन्न (स्वच्छ) मनाने वचन बोलतो किंवा काम करतो, तर सुख त्याचे अनुसरण तसेच करतो, जसे कधीही सोबत न सोडणारी सावली._*
_श्रावस्तीमद्ये अदिन्नपुर्वक नावाच्या महाकृपण ब्राम्हणास मट्ठकुण्डली नावाचा एकुलता एक मुलगा होता. सोळा वर्षाचा असतांना मट्ठकुण्डली आजारी पडला. अदिन्नपूर्वकाने संपत्ती नष्ट होण्याच्या भितीपोटी त्याचा योग्य उपचार केला नाही. मरणासन्न अवस्थेत त्याने तथागतांना पिण्डपात करताना पाहिले, त्यांच्या कडे प्रसन्न मनाने बघून तो मरण पावला आणि तावंतिस देवलोकात जन्मला._
_अदिन्नपूर्वकाला जेव्हा हे समजले तेव्हा त्याने भगवंतांना आपल्या घरी भोजनाकरीता आमंत्रित केले. भोजनोपरान्त त्याने भगवंतांना विचारले, हे गौतम ! तुम्हाला दान न देता, पुजा न करता, धर्मश्रवण न करता केवळ मनाच्या प्रसन्नतेमुळे लोक स्वर्गात जन्म घेतात?_
_" ब्राम्हण ! शतदा माझ्यावर मन प्रसन्न करून स्वर्गात उत्पन्न होणाऱ्या व्यक्तिची गणना नाही. *मनुष्याचे पाप-पुण्य कर्म करण्यात मन अग्र आणि प्रधान असते. प्रसन्न मनाने केलेले पुण्य-कर्म देवलोक अथवा मनुष्य लोकात उत्पन्न होणाऱ्या व्यक्तीची त्याच्या सोबतच राहणाऱ्या सावली प्रमाणे त्याचा साथ सोडत नाही."* तथागत असे बोलले आणि उपदेश करतांना त्यांनी हि गाथा सांगितली._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-१२/०३/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) धम्मपद - यमकवग्ग, अट्ठकथा*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment