Friday, 22 March 2024

धर्मग्रंथ पठण करण्यापेक्षा धम्माचरण श्रेष्ठ आहे.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_धर्मग्रंथ पठण करण्यापेक्षा धम्माचरण श्रेष्ठ आहे._*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/19.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*बहुम्पि चे सहितं भासमानो न तक्करो होति नरो पमत्तो ।_*

*_गोपो व गावं गणयं परेसं न भाग वा सामञ्ञस्स होति ।।_*

_*अर्थ - एखादा प्रमत्त पुरूष जरी धर्मग्रंथाचे पुष्कळ पठण करित असेल आणि त्याप्रमाणे जर त्याचे आचरण नसेल तर दुसऱ्याच्या गाई मोजणाऱ्या गुराख्याप्रमाणे तो श्रमणत्वाचा भागीदार होत नाही.*_

                     _श्रावस्तीमध्ये दोन मित्र राहत होते, बुद्धांचा उपदेश ऐकून त्यांनी प्रवज्जीत होण्यासाठी निर्णय घेतला आणि ते प्रवज्जीत झाले. त्या दोघांतील एक समथ-विपश्यना करीत लवकरच अर्हत पदी आरूढ झाला. दुसरा त्रिपिटक बुद्ध वचने शिकून पाचशे भिक्षुंना धर्म शिकवत होता. त्याच्याकडे शिकणाऱ्या सर्व भिक्षुंनी अर्हत पद प्राप्त केले, पण तो श्रोतापन्न सुद्धा होऊ शकला नाही. एके दिवशी भिक्षुंनी या दोघांची चर्चा करीत असतांना तथागत बुद्ध म्हणाले *भिक्षुंनो ! ग्रंथवाचक भिक्षु गाई चारणाऱ्या गवळ्या सारखा आहे, आणि विपश्यनेत असणारा भिक्षु पंचगोरसाचा उपभोग करणाऱ्या स्वामी समान आहे."*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२३/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - यमकवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  -

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...