Tuesday, 9 January 2024

अंनिसचे सगळे कार्यकर्ते धर्माला नाकारतात

_*प्रश्न १२ -* सर्व प्रकारच्या बुवाबाजीला विरोध करताना अंनिसच्या एकूण भूमिका लक्षात घेतल्या, तर *तुम्ही आणि अंनिसचे सगळे कार्यकर्ते धर्माला नाकारतात व सर्वसामान्य समूहाला तर नीतीनं जगण्यासाठी धर्माची आवश्यकता असते. तुमचा हा इतका प्रखर धर्मविरोध म्हणजे समाजाला नैतिकतेनं जगण्यासाठी जे काही अधिष्ठान आवश्यक असतं तेच काढून घेणं, असं होत नाही का?*_

_*उत्तर -नाही! 'मी धार्मिक आहे आणि म्हणून देवाच्या प्रीतीनं किंवा देवाच्या भीतीनं मी नैतिक वागतो', असं म्हणणारा एखादा माणूस मला या देशामध्ये भेटला, तर त्याच्याशी मनापासून हस्तांदोलन करून त्याला मिठी मारायला मी तयार आहे.*_

                 _तुरुंगामध्ये गेलेले १०० टक्के लोक धर्म आणि देव मानणारे असतात. असं कसं काय ? *देव आणि धर्म मानणारे लोक तुरुंगात नसले पाहिजेत. त्यांना देवाने वा धर्माने सांगायला पाहिजे की, 'ही सगळी अनीतिमान कृत्यं करू नका.'* किंवा आपल्या देशात सगळ्यांची सगळ्या ठिकाणी एकच तक्रार असते- *'आपल्या देशात भ्रष्टाचाराशिवाय कुठलंच काम होत नाही.' तर असं कसं काय ? या देशातली ९९.९९ टक्के माणसं धार्मिक आणि तरीदेखील हा देश भ्रष्टाचारामध्ये नंबर वन!* याचा अर्थ काहीतरी चुकतंय. *जर माणसं धर्माच्या आधारे नैतिकतेनं वागत असतील, तर त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्णपणे आदर करते.* मात्र आम्हाला असं वाटतं की, नैतिकतेनं वागण्यासाठी स्वतःचा विवेक आधारभूत असावा._

           _शाळेतल्या वर्गात दोन प्रकारे शांतता राहू शकते._ 

_१. शिक्षकांनी समजावून सांगितलंय 'सगळ्यांनी शांत राहायचं, अभ्यास चांगला होतो' म्हणून._

_२. शिक्षक भयंकर मारकुटे आहेत, दंगा केला तर ठोकून काढतात; गप्प बसलेलं बरं म्हणून._

           _या दोन्हींमुळे मुलं शांत बसतात, पण अधिक चांगलं कुठलं? पहिलं का दुसरं ? पहिलं ! कारण तो माझा निर्णय आहे. मी शांत बसायचं असं ठरवलंय. दुसऱ्या पर्यायामध्ये मी मारकुट्या शिक्षकाच्या भीतीनं निर्णय घेतो. त्याची बदली झाली की, मी दंगा करायला मोकळा ! त्याच्यामुळे _माणसाने नीतीनं किंवा विवेकानं वागावं, अशी भूमिका असणाऱ्या चळवळीचं मी काम करतो. पण जे कुणी धर्माच्या नावानं नीतीनं वागत असतील, त्यांचा आम्ही पूर्ण आदर करतो._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-  १०/०१/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_9.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...