Sunday, 7 January 2024

वास्तुशास्त्र

_*प्रश्न १० -* संमोहनाबद्दल वर्तमानपत्रांमधून आणि इतरही माध्यमांमधून जस जाहीरपणे दावे केले जातात वा जाहिराती केल्या जातात, तशाच जाहिराती वास्तुशास्त्राबद्दलही दिल्या जातात किंवा *'वास्तुशास्त्राप्रमाणे असा असा बदल केल्यामुळे ती वास्तू आम्हाला लाभली',* असं बोललं जातं. त्यासाठी सल्ले दिले जातात. ते काम व्यावसायिक पातळीवरही करणारे लोक आहेत. *मग ते सर्व लोक फसवणूक करतात, असं तुम्हाला म्हणायचंय का?*_

_*उत्तर -* जरा समजून घ्या. आपण वास्तू बांधतो. ती सुरक्षित असावी, असं आपल्याला वाटतं. अगदी बरोबर आहे. ती सोयीची असावी, असं आपल्याला वाटतं. हेही अगदी बरोबर आहे. ती सुखकारक असावी, असं आपल्याला वाटतं. हेही बरोबरच आहे._ 

          _*पण हे वास्तुशास्त्रज्ञ सांगतात, 'तेवढ्यानं चालणार नाही. ती लाभायला पाहिजे.' उदाहरणार्थ, 'त्या वास्तूमध्ये गेलं की, मुलीला मुलगाच व्हायला पाहिजे.', 'बारावीला असलेल्या मुलाला डोनेशन न देता एडमिशन मिळायला पाहिजे', 'मिस्टरांचं प्रमोशन व्हायला पाहिजे.', 'कोर्टातली केस बाजूने लागायला पाहिजे.' आणि हे कसं होईल? हे घडवण्याचा सोपा मार्ग म्हणजे, 'तुम्ही तुमच्या घराचं दार पूर्वेला ठेवा', अशा स्वरूपाचे उपाय ही मंडळी सुचवतात.*_

             _*माझा पुण्यामध्ये एका वास्तुशास्त्रज्ञाबरोबर जाहीर वादविवाद झाला होता. त्यांचं 'वास्तुप्रकाश' हे पुस्तक त्या वेळी धो-धो चाललं होतं. त्यातल्या फक्त दोन गोष्टी तुम्हाला सांगतो, म्हणजे मग वास्तुशास्त्राला अजिबात कार्यकारणभाव कसा नाही, हे तुम्हाला कळेल.*_

                 _*पूर्वेला घराचं दार असावं. का? तर आपण म्हणू शकतो, पूर्वेला सूर्य उगवतो वगैरे वगैरे. त्यांचं प्रतिपादन असं होतं... 'पूर्वेला घराचं दार असावं. कारण पूर्व म्हणजे इंग्लिशमध्ये 'ईस्ट'. इंग्लिशमध्ये 'ईस्ट' म्हणजे मराठीत 'इष्ट'. त्यामुळे पूर्वेला दार असणं इष्ट. पश्चिमेला नसावं. कारण पश्चिम म्हणजे 'वेस्ट'. वेस्ट म्हणजे टाकाऊ. त्याच्यामुळे पश्चिमेला नसावं.' म्हणजे वास्तुशास्त्र ही स्वप्नं विकण्याची कला आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाला स्वप्नं विकत घ्यायला आवडतात ना! त्यामुळे फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र ही एकमेकांची भावंड आहेत, जी स्वप्नं विकतात.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-  ०७/०१/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_7.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...