Saturday, 6 January 2024

संमोहन म्हणजे नेमकं काय ?

_*प्रश्न ९ -* मघाशी तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर देताना संमोहनाबद्दल बोलत होता. त्याचे अनेक कार्यक्रमही होतात. त्यात दावाही केला जातो की, संमोहनामध्ये अद्भुत शक्ती असते आणि व्यक्तिमत्त्व विकासाला त्याचा फायदा होतो. अनेक आजार त्याने बरे केले जाऊ शकतात वगैरे... पण तुमचं आत्ताचं विवेचन पाहता, *संमोहनात अद्भुत शक्ती असते, हे तुम्हाला मान्य नसावं. तर मग संमोहन म्हणजे नेमकं काय ?*_

_*उत्तर - सध्या संमोहनाविषयीच्या पानपानभर जाहिराती ज्यांच्या येतात त्यांच्याबरोबर नाशिकला एका व्यासपीठावर चर्चा करून मी त्यांना 'संमोहनात काडीचीही अद्भुत शक्ती नसते' हे कबूल करायला लावलेलं आहे.*_

              _*संमोहन ही मनाची एक साधी अवस्था असते. जशी जागृती, झोप, स्वप्न, बेशुद्धी, तशी संमोहन ही अवस्था असते. सोप्या भाषेमध्ये सांगायचं, तर संमोहन ही सूचनांशी जोडलेली तंद्रीची अवस्था असते. संमोहनामध्ये अशी कोणतीही गोष्ट घडून येत नाही की, जी फक्त त्यामुळेच घडून येते आणि इतर गोष्टींनी घडून येत नाही. संमोहनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही इतरही पद्धतीने घडून येते.*_

              _*संमोहनाचे जे जाहीर कार्यक्रम केले जातात, ते अनेक देशांमध्ये बॅन आहेत. कारण त्यामुळे लोकांमध्ये भ्रम तयार होतो. संमोहनाने स्मरणशक्ती वाढत नाही.* आमचं संमोहन शास्त्रीय आहे आणि आम्ही डॉक्टर आहोत असे जे दावे केले जातात, त्यात तथ्य नाही. संमोहनाचे प्रयोग करणारा आत्तापर्यंत तरी डॉक्टर असलेला माणूस मला माहीत नाही. *संमोहनाची कुणाला परवानगी दिलेली आहे? केंद्र शासनानं असं म्हटलेलं आहे की, मान्यताप्राप्त पदवी असलेला माणूस पूरक आणि दुय्यम बाब म्हणून संमोहनाचा उपयोग करू शकेल.*_

               _*सध्याच्या संमोहनाच्या प्रचारकांपैकी कोणीही मान्यताप्राप्त पदवीधर नाही. जे आपल्या नावामागे डॉक्टर लावतात, ते नॅचरोपॅथीचे डॉक्टर आहेत. त्यांना मान्यताप्राप्त पदवी नाही. हे मी अत्यंत जबाबदारीने आणि अंनिसचा कार्यकर्ता म्हणून बोलतोय. त्यांनी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे, ते मान्यताप्राप्त नाही. त्यामुळे संमोहन म्हणजे एक प्रकारचा भूलभुलैया आहे आणि त्याआधारे अंधश्रद्धाच निर्माण होते, ही वस्तुस्थिती आहे.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-  ०६/०१/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_6.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...