_*प्रश्न १७ -* म्हणजे एकंदरीत देव आणि धर्म यांच्याबद्दल अंनिसची भूमिका अलिप्त किंवा तटस्थ अशा प्रकारची आहे. परंतु *काही ठिकाणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी अशी आंदोलनं केलीत की, 'महिलांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे' किंवा 'गणेशोत्सवाच्या वेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती न बनवता मातीच्या मूर्ती बनवल्या पाहिजेत.' पण मग प्रश्न येतो, तुम्ही जर तटस्थ आहात तर अशा गोष्टींमध्ये लक्ष घालण्याचं काय कारण ?*_
_*उत्तर - भारतीय राज्यघटनेनं लोकांना दिलेले हक्क धर्माच्या नावानं नाकारले जाऊ नयेत किंवा लोकांसाठी विघातक असणाऱ्या गोष्टी त्यातून घडू नयेत, यासाठी कृतिशीलपणे काम करणारे आम्ही लोक आहोत.*_
_*शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांनी चढण्यासाठी आम्ही जो सत्याग्रह केला, तेव्हा इतका प्रचंड प्रक्षोभ झाला होता की आम्हाला नगरलाच अटक करण्यात आली.* काही लोक म्हणाले, 'काय तुम्ही! ज्या ठिकाणी बायकांनी जायचं नाहीये त्या ठिकाणी तुम्ही जाता. आमच्या हिंदू धर्माला धक्का देता.' *ज्यांनी आमच्या विरोधात हे आंदोलन केलं, त्या भाजपच्या महिला आघाडीच्या बायकांनीच अकरा वर्षांनंतर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात 'बायकांना कसा प्रवेश नाही', म्हणून गाभाऱ्यात प्रवेश केला.*_
_*म्हणजे तुम्हाला शहाणपण उशिरा सुचलं. त्यामुळे प्रश्न असा आहे की, सार्वजनिक राबत्याच्या ठिकाणी जर सगळ्यांना जात-धर्म-लिंग-निरपेक्ष प्रवेश असेल, तर तुम्हाला ते रोखण्याचा अधिकार दिला कोणी? बाईने देवळात जायचं का नाही, हे बाईचं बाई ठरवेल. 'पण तू बाई आहेस म्हणून तिथं जाऊ नकोस', असे सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही.*_
_मगाशी मी म्हटलं तसं, *दीड कोटी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती दरवर्षी पाण्यात टाकल्या जातात... यंदा मी अनेक महानगरपालिकांच्या आयुक्तांशी बोललो. ते सगळे जण म्हणाले, 'अहो, पर्यायी हौद बांधून फायदा नाही. कारण पर्यायी हौदातल्या मूर्ती टाकायच्या कुठं?' अडचण आहे! त्यावर आम्ही 'मातीच्या मूर्ती करा' हा साधा उपाय सुचवला. तो सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाने मान्य केला. मातीची मूर्ती हौदात टाकली की, आपोआप विरघळते. ती घराच्या टबात टाकली तर, ती माती घरातल्या फुलझाडांना वापरा. सार्वजनिक टबात टाकली तर, ती सार्वजनिक उद्यानासाठी वापरली जाईल. या साध्या गोष्टी पर्यावरणाशी सुसंगत आहेत. त्यामुळे या गोष्टींना एक व्यापक परिवर्तनाचा अर्थ आहे.*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- १५/०१/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_14.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment