Monday, 15 January 2024

धार्मिक विधी करणं त्यासंदर्भातील नियम बनवणं हा धर्मशास्त्राचा अधिकार आहे.

_*प्रश्न १८-* मगाशी तुम्ही महिलांच्या अधिकाराबद्दल बोलत होतात, परंतु *अनेक लोकांना असं वाटतं की, 'धार्मिक विधी करणं त्यासंदर्भातील नियम बनवणं हा धर्मशास्त्राचा अधिकार आहे. मग त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार अंनिसला नेमका कुणी दिला?'*

_*उत्तर - भारतीय राज्यघटनेनं दिला! अहो, राज्यघटनेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हे नागरिकांचं कर्तव्य सांगितलंय. ते काय आहे, तुम्हाला सांगू का? ते शब्द असे आहेत- "It is a duty of every Indian citizen to promote scientific temperament, spirit of enquiry, spirit of reform and humanism." नुसतं वैज्ञानिक दृष्टिकोन म्हटलेलं नाही, नुसतं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करा, असंही म्हटलेलं नाही. त्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबर हे घातलेलं आहे की, 'तुम्ही धर्मचिकित्सा करा आणि धर्मचिकित्सा यासाठी करा की, मानवतावादाचा विजय होईल.'*_

             _आज तुम्ही स्त्रीभ्रूणहत्येबद्दल बोलता आणि ते बरोबरच आहे, पण मला याची खात्री आहे की, *आजही मुलीचं कन्यादान होतं. मुळात कन्या ही काही दान करण्याची गोष्ट नाही. ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. बरं, मुलीची आई वारलेली असेल, तर तिचा बाप कडेला सुपारी खोचतो आणि कन्यादान करतो आणि जर मुलीचा बाप वारलेला असेल, तर कन्यादान कोण करतं? मामा किंवा भाऊ करतो. मुलीला पोटात नऊ महिने कुणी वाढवलेलं असतं? आईनं. मग तिचा अधिकार नाही? म्हणजे मुळात कन्यादान करू नये, पण करायचं असेल, तर ते आईनं केलं पाहिजे. ही विधायक धर्मचिकित्सा आहे. हा सुधारणावाद आहे. 'तो तुम्ही सांगा', असं आम्हाला राज्यघटनेनं सांगितलंय.*_

               _*तुकाराम काय म्हणाले- 'तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी।।'- अरे, कशाला तीर्थक्षेत्राला जाता, तिथे तीर्थ नाही, पाणी आहे; तिथे देव नाही, धोंडा आहे. तुम्हाला खरोखर देव पाहिजे ना, तर 'रोकडा सज्जनी' म्हणजे सज्जन माणसाला भेटा.*_

          _तरीदेखील तुम्ही एका मुहूर्तावर गोदावरीमध्ये बुडी मारून स्वतःचा बारा वर्षांचा पापाचा बँक बॅलन्स क्लिअर करण्यासाठी (सिंहस्थासाठी) एक हजार कोटी रुपये मंजूर करता ! मग त्याबद्दल बोलणार नाही आणि चिकित्सा करणार नाही तर काय करणार?_

            _मुळात, *आमचा धार्मिक विधीला अजिबात आक्षेप नाही, पण ज्या ठिकाणी ती गोष्ट संविधानस्वातंत्र्याची मर्यादा ओलांडते तिथे आम्ही विरोध करणार!* जर एखादा माणूस म्हणाला की, 'मी दिवसातनं तीन वेळा अंघोळ करतो.' तर जास्तीत जास्त मी त्याला एवढंच म्हणेन की, 'पाण्याची स्थिती बघ, पण तीन वेळा तुला अंघोळ करायचीच आहे, तर कर बाबा! तुझा धार्मिक अधिकार आहे. माझा काय संबंध!' *परंतु तुम्ही ज्या वेळी ते सार्वजनिक जीवनात आणता, त्याला शोषणाचा वा विषमतेचा भाग बनवता त्या वेळी संघर्षाचा प्रश्न येतो.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-  १६/०१/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_15.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


No comments:

Post a Comment

सुजातसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_सुजातसुत्तं* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_21.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _श्रावस्ती नगरीत ...