🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_आयुष्यमान आनंदमधील अद्भुत गुण_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_२०७. तेव्हा आयुष्यमान आनंद विहारात जाऊन एक खुंटी पकडून उभ्यानेच रडू लागले, 'मी अद्याप अशिक्षित आहे. माझ्यावर करुणा करणारा जो शास्ता आहे. त्यांचे तर परीनिर्वाण होणार आहे."_
_भगवंतांनी भिक्षूना विचारले, "भिक्षूनो! आनंद कोठे आहे?"_
_"भंते! आयुष्यमान आनंद विहारातील खुंटीला पकडून रडत उभे आहेत."_
_"होय! मी अशिक्षितच राहिलो. माझ्यावर करुणा करणारे माझे शास्ता (गुरू) यांचे तर परिनिर्वाण होणार आहे" हे ऐकल्यानंतर तथागतांनी एका भिक्षुला सांगितले की,_
_"हे भिक्षू! माझा निरोप आनंदला सांग की, "हे आनंद! तुला (शास्ता) तथागत तुला बोलवित आहेत."_
_"होय भंते," असे त्या भिक्षूने उत्तर दिल्यानंतर, तो भिक्षु जेथे आयुष्यमान आनंद होता तेथे गेला व म्हणाला, "आयुष्यमान आनंद तुम्हाला तथागत बोलावित आहेत."_
_"ठिक आहे आयुष्यमान !" असे त्या भिक्षूला उत्तर देऊन जेथे भगवान होते तेथे आयुष्यमान आनंद गेले, त्यांना अभिवादन करून ते एका बाजूला बसले._
_एका बाजूला बसलेल्या आयुष्यमान आनंदला तथागत म्हणाले, "बस कर आनंद! दुःख करू नकोस, रडू नकोस, आनंद मी तुला पहिलेच हे सांगितले नव्हते काय! की, *सर्व प्रियजनांचा, नातेवाईकांचा वियोग सहन करावा लागेल, विरह सहन करावा लागेल. जे उत्पन्न आहे त्याचा नाश होणारच आहे. तथागतांच्या शरीराचा नाश होणार नाही कसे शक्य आहे?*_
_*आनंद! तू दीर्घकाळपर्यंत अत्यंत मैत्रीपूर्वक तथागतांची कायेने सेवा केली आहेस, तू मनापासून मैत्रीपूर्वक वाचेने व मानसिक कर्माने तू तथागतांची सेवा केली आहेस. आपल्या धम्मकामात मग्न रहा. काही कालावधीतच तू मुक्त (अनास्त्रव) होशील."*_
_२०८. भगवंतांनी भिक्षूना सांगितले की, *"भिक्षुंनो! जेव्हा जेव्हा भूतकाळात तथागत- अर्हत-सम्यक्-सम्बुद्ध या जगात निर्माण होतील तेव्हा तेव्हा भगवंतांचे सेवक (उपस्थापक) असे असतील; जसा माझा आनंद आहे. भिक्षूनो । आनंद पंडीत आहे, आनंद लाघवी आहे; त्याला माहीत आहे की, कोणत्या वेळी भिक्षूंना तथागताच्या दर्शनास पाठवावे. ही वेळ भिक्षुणींची आहे, तमुक वेळ उपासकांची आहे, उपासिकेची आहे किंवा राजा, राजमंत्री, तसेच तीर्थकारांची व श्रावकांची तथागतांना भेटण्याची ठराविक ही वेळ योग्य आहे."*_
*_२०९. "भिक्षूनो! आनंदमध्ये चार अद्भुत गुण आहेत. ते चार कोणते?_*
_*१.* जर भिक्षु संघ जर आनंदला भेटू इच्छित असेल. तर भिक्षु संघ त्याला भेटून आनंदात असतो. जर आनंद धम्म प्रवचन देत असेल तर ते ऐकून भिक्षू संघ आनंदात असतो. जर भिक्षु संघ प्रवचन ऐकून तृप्त झाला तरच आनंद गप्प बसतो._
_*२.* भिक्षुणी संघ आनंदास भेटतात तेव्हा त्या संतुष्ट होतात. जर आनंद धम्मावर प्रवचन देत असेल तर त्या मंत्रमुग्ध होऊन ऐकतात, तेव्हाच आनंद शांत बसतो._
_*३.* उपासक आनंदाचे दर्शन घेतात. तेव्हा ते अत्यंत समाधानी होतात. जर आनंद धम्म उपदेश देत असेल तर ते तो धम्म उपदेश ऐकून तृप्त होतात._
_*४.* जर उपासिका त्याला पाहण्याची इच्छा करीत असतील तर त्या त्याला पाहून आनंदित होतात. जर आनंद त्यांना धम्म ऐकवित असेल तर भिक्षूनो! त्या उपासिका स्वतःला धन्य समजतात. हे भिक्षूनो! हे आनंदमध्ये आश्चर्यकारक चार गुण आहेत."_
*_"भिक्षूंनो! चक्रवर्ती राजामध्ये हे चार आश्चर्यकारक गुण असतात. कोणते चार ?_*
_*१.* जर भिक्षूनो! चक्रवर्ती राजाचे दर्शन क्षत्रिय लोक घेऊ इच्छित असतील तर ते त्याचे दर्शन घेऊन समाधानी होतात. जर तो त्यांना भाषण देणार असेल तर ते क्षत्रिय त्याचे भाषण ऐकून आनंद व्यक्त करतात. जर सर्व क्षत्रिय त्याचे भाषण ऐकून तृप्त झाले तरच तो गप्प राहतो._
_*२.* जर भिक्षूनो ! चक्रवर्ती राजाचे दर्शन ब्राह्मण लोक घेऊ इच्छित असतील. तर ते त्याचे दर्शन घेऊन समाधानी होतात. जर तो त्यांना भाषण देणार असेल तर ते ब्राह्मण त्याचे भाषण ऐकून आनंद व्यक्त करतात. जर सर्व ब्राह्मण त्याचे भाषण ऐकून तृप्त झाले तरच तो गप्प राहतो._
_*३.* जर भिक्षूनो! चक्रवर्ती राजाचे दर्शन श्रमण लोक घेऊ इच्छित असतील तर ते त्याचे दर्शन घेऊन समाधानी होतात. जर तो त्यांना भाषण देणार असेल तर ते श्रमण त्याचे भाषण ऐकून आनंद व्यक्त करतात. जर सर्व श्रमण त्याचे भाषण ऐकून तृप्त झाले तरच तो गप्प राहतो._
_*४.* जर गृहपती यांना दर्शन हवे असेल तर तो त्यांना दर्शन देऊन त्यांना आनंदित करतो, तसेच त्याच्याकरिता भाषण करून त्यांना तृप्त करतो. ते झाल्यानंतरच तो शांत होतो. भिक्षूनो ! अशाच त-हेचे गुण आनंदात देखील आहेत."_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- १०/१२/२०२३_*
*_संदर्भ :-_*
*_१) महापरिनिब्बानसुत्त (मराठी अनुवादासह - संपादक आयु अरविंद भंडारे_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_9.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment