🙏🏽🌺✨🙏🏽🌺✨🙏🏽🌺✨🙏🏽✨
*_ओम मणी पद्मे हुं_*
*_तुझा प्रकाश तुलाच निर्माण करायचा आहे_*
🙏🏽🌺✨🙏🏽🌺✨🙏🏽🌺✨🙏🏽✨
_*बोकोई नावाच्या झेन गुरूंकडे* एक अतिशय हुशार, तल्लख बुद्धीचा विद्यार्थी शिकण्यासाठी होता, मात्र बुद्धवचन समजून घेताना त्याला अडचण येत होती._
_बोकोई रोज संध्याकाळी जंगलामध्ये फिरायला जात. सोबत त्यांचा आवडता कुत्रा असायचा. बोकोई ने एखादा लाकडाचा तुकडा फेकला की कुत्रा धावत जाऊन आणत असे आणि दुसऱ्या खेळाची वाट पाहत आणि हे रोज होत असे._
_बोकोई ने त्या विद्यार्थ्याला संध्याकाळी आपल्यासोबत फिरायला नेले. कुत्रा नेहमी प्रमाणे फेकलेल्या वस्तू घेऊन येत असे. *बोकोई ने आकाशात दिसणाऱ्या चंद्राकडे बोट केले आणि कुत्र्याला म्हणाला - जा, मला तो चंद्र घेऊन ये. कुत्र्याने बोटाकडे पाहिले.*_
_बोकोई ने विद्यार्थ्याला विचारले, कुत्र्याचे लक्ष कुठे होते? विद्यार्थी म्हणाला - तुमच्या बोटाकडे._
*_बोकोई म्हणाला - या कुत्र्यासारखा होऊ नकोस. बुद्धवचन हे फक्त मार्गदर्शक आहेत, दिशादर्शक आहेत. त्यात अडकून बसू नकोस. त्यांनी निर्देशलेल्या मार्गावर तुलाच चालायचे आणि पोहचायचे देखील आहे. जसे बोटाकडे पाहून चंद्र मिळणार नाही, तसेच बुद्धवचन वाचून बुद्धत्व मिळणार नाही!_*
🙏🏽🌺✨🙏🏽🌺✨🙏🏽🌺✨🙏🏽✨
No comments:
Post a Comment