🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अमृताचे बोल_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*कपिलवस्तु शहरातील एक शाक्य राजकुमार उत्तिय.* भगवानांचा उपदेश ऐकून प्रव्रजित झाला. *कामवासनेचे संस्कार समूळ नष्ट करू इच्छित होता. त्याला जाणीव झाली होती की, विपश्यना साधना हाच यावरील एकमेव सहजसुलभ वैज्ञानिक मार्ग आहे, म्हणून तो दृढतेने विपश्यनेचा अभ्यास करू लागला.*_
_एक दिवस भिक्षाटनासाठी तो गावात गेला. तिथे एका कोकिळेसारखा मधुर आवाज असलेल्या स्त्रीची स्वरमाधुरी ऐकून तिच्यावर मोहित झाला. कारण त्या कामातुर सौंदर्यवतीच्या प्रेमगीतात कामभोगाचे मूक आव्हान होते, ते बोल भिक्षूच्या अंतःकरणात खोल जाऊन बसले. मनांत कामवासनाच थैमान घालु लागली. कामज्वराने पीडित झाला. वासनाविकाराने त्याला ग्रासले. त्या प्रेमगीताचे बोल वारंवार त्याला सतावू लागले. पुन्हा पुन्हा तेच तेच आठवू लागले._
_तेव्हा भगवानांचे अमृताचे बोल त्याला आठवले._
*_“सद्दं सुत्वा सतिमुट्ठा, पियं निमित्तं मनसिकरोतो” इत्यादी इत्यादी._*
*_म्हणजे केवळ शब्द ऐकून स्मृती भ्रष्ट होते. शब्दांचे निनादच गोड वाटू लागतात आणि मन त्याच रसात रंगून जाते व त्यातच त्याची तंद्री लागते. भवसंसाराच्या प्रपंच प्रवाहात वाहून नेणाऱ्या आस्रवांमुळे कामविकारांचे संवर्धनच होते._*
_त्याला लगेच जाण आली. स्मृती जागृत झाली. कामशब्दांमध्ये आसक्तीने बुडण्याचा प्रसंग. परंतु या शब्दांमुळे अधोगतीकडे जाणारे मन सावरले आणि ह्या प्रसंगाने त्याला एक बहुमूल्य प्रेरणा मिळाली व मुक्तीमार्गाकडे त्याची वेगाने वाटचाल सुरू झाली. अपरिमित उत्साह जागला *आणि तो 'सतिमुट्ठा' कडून 'सतिपट्टान' कडे वळला.* कामवासनेच्या तत्कालिक पूरातून तो बाहेर आला एवढेच नव्हे तर योग्य पद्धतीने संवदेनांच्या आधाराने विपश्यनेचा अभ्यास करीत करीत भवसंस्कारांच्या संवर्धनातून मोकळा होऊन दीर्घकालसंग्रहित वासनेची उदीर्णा आणि नाश ह्यामध्ये गढून गेला._
_वेळ येताच भिक्षु उत्तिय संपूर्णतया विकारमुक्त झाला आणि अरहंतांच्या पंक्तीत येऊन बसला..... *वासनाविमुत्त उत्तिय!*
*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*
*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*
*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०७/०९/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_7.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment