Sunday, 7 August 2022

बुद्ध धम्मात मूर्तिपूजेचे स्थान

 धम्माविषयी सामान्य ज्ञान


बुद्ध धम्मात मूर्तिपूजेचे स्थान


बुद्ध धम्मात मूर्तिपूजेला स्थान नसले तरी त्याचा अर्थ वेगळा आहे. चुन्याची माती किंवा पितळेच्या धातूला वंदन करणे, आदर करणे किंवा त्याची पूजा करणे हा त्यामागे हेतू नसतो. जेव्हा आपण बुद्ध मूर्तिला वंदन करतो त्यावेळी आपण सम्यक सम्बुद्धाचे लक्षण आणि गुण यांचे स्मरण 

करत असतो त्याला वंदन करत असतो. तथागतांच्या करूणेला, सर्व प्राणिमात्रांविषयी असलेल्या प्रेमाला, नैतिकतेला, दानशूरतेला, प्रज्ञेला आपण वंदन करत असतो. बुद्धांची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्याला बुद्धगुणांची आठवण करून देत असते. जेव्हा आपण बुद्धगुणांविषयी आदर व्यक्त करतो तेव्हा आपण ते अंगिकारण्याचा 

प्रयत्न करत असतो.

उदा. ज्यावेळी आपण आपल्या परिवारापासून दूर असतो त्यावेळी आपण त्यांचा विचार करत असतो अथवा त्यांच्याप्रती खूप प्रेम व्यक्त करत असतो. परंतु जर आपणाकडे त्यांचा फोटो असेल तर आठवणी जास्त उफाळून येतात. जेव्हा आपण तो फोटो पाहून आपल्या परिवाराप्रती प्रेम अनुभवत असू तर ते प्रेम त्या फोटोप्रती नसून आपल्या परिवाराप्रती असते. तो फोटो आपल्या आठवणी मजबूत करत असतो तेच कारण बुध्दमूर्ती किंवा चित्रांबद्दल असते.


अरविंद भंडारे 

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई

08/08/2015

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...