Thursday, 4 August 2022

अपूर्व प्रेरणा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अपूर्व प्रेरणा_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

         _राजगृहाच्या एक संपन्न शेठजीच्या घरात *रमणीयविहारी* नावाच्या ज्येष्ठ पुत्राचा जन्म झाला. विलासमय वैभवशाली वातावरणात तो वाढला. युवावस्थेत पदार्पण करताच तारुण्याच्या भरात उन्मादकतेने प्रेरीत होऊन कामभोगाचे विलासी-स्वेच्छाचारी जीवन तो उपभोगू लागला. एकदा त्याला असं आढळलं की त्याच्याप्रमाणेच कामविकाराधीन होऊन व्यभिचार करणाऱ्या एका राजपुरुषाला या गुन्ह्याबद्दल राजप्रशासनाने भयानक शिक्षा दिली. ते पाहून घाबरून जाऊन तो युवक भयंकर व्याकुळ झाला. *मानसिक शांतीसाठी तो भगवान बुद्धांच्या विहारांत आला आणि भगवानांची धर्मवाणी ऐकूण उल्हसित झाला व लगेच त्याने व्रतस्थ जीवन अंगिकारले.* भगवान बुद्धांनी त्याला विपश्यना साधना शिकविली. त्याप्रमाणे एका निर्जन स्थानी जाऊन तो साधना करू लागला. परंतु *पूर्व स्वभावधर्माप्रमाणे, पुष्कळ प्रयत्न करूनही मनांत कामवासनेचे थैमान चालू राहिले. जेव्हा मनाला जाग येई तेव्हा पश्चातापाने होरपळून निघे. पण साक्षी भावनेने विपश्यना करू शकत नव्हता.* अशाच भग्न मनस्थितीत *तो एका झाडाखाली बसला होता. समोर रस्ता होता. रस्त्याने एक बैलगाडी खाचखळग्यातून जात असता एक बैल दगडाला ठोकरून पडला. गाडीवानाने मोठ्या प्रेमाने त्याला उठविले. प्रेमाने पाठीवर थोपटले. जोखडा-खालून मुक्त केले. काही काळ त्याला विश्रांती दिली. चारापाणी दिले. तो अनुभवी बैल गाडीला जुंपताच, दुप्पट उत्साहाने चालू लागला. तोच खाचगखळग्याचा रस्ता त्या अनुभवी बैलाने मोठ्या उल्हसित वृत्तीने पार केला. हे दृश्य पाहून साधक रमणीयविहारी प्रफुल्लित झाला. त्याच्या मनात अपूर्व प्रेरणा जागृत झाली. मोठ्या उत्साहाने त्याने पुन्हा साधनेस प्रारंभ केला आणि याच जीवनात निर्वाण अवस्थेला पोहोचला.*_

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०५/०८/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/08/blog-post_4.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...