➡️ *_सम्राट अशोकाने ३ ऱ्या धम्म संगीतीनंतर मध्यान्तिक नावाच्या बौद्ध भिक्खूस काश्मिरात धम्म प्रचारार्थ पाठविले होते_*
➡️ *_बौद्ध भिक्षु मध्यान्तिक यांनी सर्वप्रथम "केशर" हे गांधामदान पर्वतातून आणून त्याची लागवड काश्मिरात केली._*
➡️ *_खरोष्टी लिपी काश्मिरात होती, स्वात देशाचा राजा नागवंशीय होता. स्वात म्हणजे उद्यान, जो काश्मिरचा भाग होता. त्या नागवंशीय राजाचे नाव "अपलाल" होते._*
➡️ *_सम्राट कनिष्काने ४थी धम्मसंगीती काश्मिरातील कुंडलवन येथे आयोजित केली होती_*
➡️ *_काश्मीर हे सर्वास्तीवाद संप्रदायाचे प्रमुख ठिकाण होते, या संप्रदायाचे तत्वज्ञान संस्कृत भाषेत शुद्ध स्वरूपात काश्मिरात शिकविले जात होते. या संप्रदायाला "वैभाषिक" म्हणून ही ओळखले जात होते._*
➡️ *_काश्मीरमध्ये ह्यू-एन्-त्संग २ वर्ष वास्तव्यास होते. त्यांनी त्रिपिटकावरील टीका ग्रंथांची चिनी भाषेत भाषांतर केली होती._*
➡️ *_कात्यायन पुत्राने काश्मिरात येऊन एक लाख श्लोकांची रचना करून विभाषास वाङ्मयीन रूप दिले, त्यास "अभिधर्मविहाविभाषाशास्त्र" म्हणतात._*
➡️ *_सम्राट अशोकाने ४०० संघाराम काश्मिरात बांधून दिले होते. तसेच मध्यान्तीक स्थविर धम्मप्रचारार्थ काश्मीरला गेला असता त्यास तेथील एका नाग राजाने ४०० विहार अर्हतासाठी दान केले._*
➡️ *_सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत काश्मिरात चार उंच स्तूप होते. राजतरंगणीनुसार सम्राट अशोकाने काश्मिरात चैत्य बांधल्याचा उल्लेख मिळतो. हा चैत्य अशोकानेच उभारलेल्या धर्मारण्य नावाच्या विहारात होता._*
*_काश्मिरातील आपला इतिहास आपल्याला माहीत असावा_*
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
No comments:
Post a Comment