Thursday, 16 September 2021

सम्यक संबुद्धाचे चित्त

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                  *_सात प्रकारचे चित्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼         

          *_मनुष्यात वसणारे सात प्रकारचे चित्त पाहण्यात येतात ते असे -_*

*१)* सक्लेश म्हणजे चिकटलेले आहे असे

*२)* श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त

*३)* सकृदागामी व्यक्तीचे चित्त

*४)* अनागामी व्यक्तीचे चित्त

*५)* अर्हत व्यक्तीचे चित्त

*६)* प्रत्येक बुद्धाचे चित्त

*७)* सम्यक संबुद्धाचे चित्त


*_७) सम्यक संबुद्धाचे चित्त_*

         _"सातव्या प्रकारचे चित्त या सहाही चित्ताहून पुर्णतः वेगळे असते. ज्यांनी सम्यक संबुद्धत्व प्राप्त केले. त्यांना जगातील सर्वच प्रकारचे ज्ञान असते, अर्थात ते सर्वज्ञ असतात. त्यांना दहा प्रकारची शक्ती लाभली असते. म्हणूनच ते दशबल या नावाने संबोधिले जातात. चार प्रकारच्या विशेष ज्ञानावर त्यांचा आत्मविश्वास असतो. बुद्ध धर्माची १८ लक्षणे त्यांचे अंगी असतात. त्यांचे इंद्रिये पूर्णतः ताब्यात असतात. त्यांच्या आकलन शक्तींपासून काहीही लपून राहूं शकत नाही. अर्थात त्यांचे ज्ञान सर्वत्रगामी असते. समस्त क्षेत्रांत त्यांचे चित्त तेजस्वी आणि दृतगामी असते. कारण की, ते सर्वच प्रकारे एकदम परिपूर्ण व परिशुद्ध झालेले असते."_

             _*बुद्धत्व प्राप्त केलेल्या लोकांचे चित्त सर्वच विषयात अत्यंत तीक्ष्ण व दृतगती असते. कारण ते सर्व प्रकारे परिपूर्ण व परिशुद्ध झालेले असतात. हाच चित्ताचा सातवा प्रकार होय.*_

        *_हे जे सातव्या प्रकारचे सम्यक संबुद्धांचे चित्त आहे, ते बाकी सर्व चित्तांपेक्षा सर्वच प्रकारे श्रेष्ठ असते. ते आपल्या अपरिमित गुणांमध्ये हलके व शुद्ध असे असते. त्यांचे चित्त इतके हलके आणि शुद्ध असल्या कारणानेच भगवान सम्यक संबुध्द दोन्ही प्रकारच्या ऋद्धिशक्ती दाखवू शकतात. यावरूनच त्यांच्या चित्ताची शुद्धता व हलकेपणा दिसून येते. याशिवाय त्या ऋद्धिशक्तीचे दुसरे कोणते कारण दिसत नाही. या ऋद्धिशक्तींची सुद्धा भगवान बुद्धाच्या चित्ताशी तुलना केली तर त्याही अत्यल्प वाटतात. तरीपण भगवान बुद्धाची सर्वज्ञाता 'आवर्जन' प्रतिबद्ध (इच्छा करताच सिद्ध होणारी) अशी होती. ज्या गोष्टी जाणून घ्यावयाच्या आहेत त्या क्षणात चिंतन (ध्यान) करून भगवान बुद्ध जाणून घेत असत, यातच त्यांची सर्वज्ञता होती._*

           *_बुद्धाची सर्वज्ञता प्रतिबद्ध असते. ज्या गोष्टीस ते जाणून घेऊ इच्छितात, ध्यान करून तत्काळ ते जाणून घेतात. परंतु केवळ त्यांनी ध्यान केले म्हणून त्यांच्यापाशी ज्ञानाचा तुटवडा होता असे समजू नये._*

*_समाप्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...