🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सात प्रकारचे चित्त_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_मनुष्यात वसणारे सात प्रकारचे चित्त पाहण्यात येतात ते असे -_*
*१)* सक्लेश म्हणजे चिकटलेले आहे असे
*२)* श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त
*३)* सकृदागामी व्यक्तीचे चित्त
*४)* अनागामी व्यक्तीचे चित्त
*५)* अर्हत व्यक्तीचे चित्त
*६)* प्रत्येक बुद्धाचे चित्त
*७)* सम्यक संबुद्धाचे चित्त
*_६) प्रत्येक बुद्धाचे चित्त_*
_"सहाव्या प्रकारचे चित्त पाचही चित्ताहून वेगळे असते ते म्हणजे *प्रत्येक बुद्ध.* ते स्वतःचा आधार स्वयंमच असतात, त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते, त्यांचा कोणी गुरू किंवा आचार्य नसतो, त्यांचे वास्तव्य गेंड्याच्या शिंगाप्रमाणे एकट्याचेच असते, ते आपल्या जीवनात एकदम निर्मळ व परिशुद्ध झालेले असतात, त्यांच्यात कसल्याही प्रकारचा दोष नसतो."_
*त्यांचे चित्त स्वतः संबंधाने अतिशय हलके व गतिमान असते. परंतु सम्यक संबुद्धांच्या क्षेत्राच्या बाबतीत जड आणि मंदच असते. कारण, जरी ते प्रत्येक बुद्धाच्या विषयी बिलकुल, परिशुद्ध व निर्मळ असले तरीपण सर्वज्ञ बुद्धाचे क्षेत्र विशाल आहे, ते स्वतः प्रज्ञावंत असून दुसऱ्यांना देखील प्रज्ञेच्या मार्गाने नेतात ते सर्वज्ञ बुद्ध होत.*
*_असे तरी का व्हावे, तर प्रत्येक बुद्ध स्वतःच्या क्षेत्रामध्ये एकदम निष्कलंक असले तरी सम्यक संबुद्धाचे क्षेत्र इतके विस्तृत असते की सामान्य बुद्ध तेथे पोहचूच शकत नाही. त्यांच्या चित्ताच्या कार्य शक्तिला तोड नाही._*
*_"समजा एखादा माणूस आपल्या परिसरातील लहान ओढे किंवा लहान नदी तो स्वतःच्या इच्छेनुसार कधीही पार करतो. मग ती दिवस असो की रात्र असो त्याला कशाचीही भीती वाटत नाही; परंतु अत्यंत खोल, विशाल, अथांग आणि ज्यांचा किनारा दृष्टीस पडत नाही असा महान समुद्र जर त्याने पाहिला तर त्यास काय वाटेल? तो भयभीत होईल आणि पलीकडे जाण्याची हिम्मत सुद्धा चुकूनही करणार नाही. असेच प्रत्येक बुद्धाचे. कारण आपल्या क्षेत्रातील नदीशी तो पूर्णपणे परिचित आहे. परंतु महान समुद्र विशाल आहे. हाच चित्ताचा सहावा प्रकार होय."_*
*_क्रमशः_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*संदर्भ:*
*मिलिन्द प्रश्न*
*मेण्डक प्रश्न*
*संकलन : महेश कांबळे*
http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment