Tuesday, 14 September 2021

अर्हतपद प्राप्त व्यक्तीचे चित्त

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                  *_सात प्रकारचे चित्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

         

          *_मनुष्यात वसणारे सात प्रकारचे चित्त पाहण्यात येतात ते असे -_*

*१)* सक्लेश म्हणजे चिकटलेले आहे असे

*२)* श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त

*३)* सकृदागामी व्यक्तीचे चित्त

*४)* अनागामी व्यक्तीचे चित्त

*५)* अर्हत व्यक्तीचे चित्त

*६)* प्रत्येक बुद्धाचे चित्त

*७)* सम्यक संबुद्धाचे चित्त


*५) अर्हतपद प्राप्त व्यक्तीचे चित्त*

           *_"ज्यांनी अर्हतपदाचा लाभ करून घेतला आहे. ज्यांचे चारही आश्रव तुटून पडले, ज्यांचे क्लेश-मळ सर्वस्वी नाहीसे झाले, चित्त निर्मळ व स्वच्छ झाले, ज्यांचे ब्रह्मचर्य जीवन सफल झाले, अडचणीचे ओझे उतरले, कार्यसिद्धी पूर्ण झाली. ज्यांना सत्यज्ञानाचा साक्षात्कार झाला, ज्यांचे समस्त भवबंधने नष्ट होऊन चित्त पुर्णतः विशुद्ध झाले. श्रावकांनी मानवी जीवनात करावयाच्या किंवा समजूत घ्यावयाच्या बाबतीत ज्यांच्या चित्ताने सफलता प्राप्त केली आहे म्हणजे यांत ते हलके व तत्पर आहे. परंतु प्रत्येक बुद्धाच्या भूमी संबंधाने ते अजूनही जड व मंदच असते. श्रावकाच्या भूमिकेत त्याचे चित्त एकदम परिशुद्ध झाले असते, तरी प्रत्येक बुद्धाच्या भूमिकेसंबंधाने अजून शुद्ध झालेले नाही."_*

         _"उदा. वेळवाची संपूर्ण रांज तोडून एकदम साफ केली असता त्यातील कोणताही वेळू सहजपणे ओढून काढता येतो. त्याप्रमाणे अर्हतपद प्राप्त केलेल्या व्यक्तीचे असते. श्रावकाने मानवी जीवनांत करावयाच्या किंवा समजून घ्यावयाच्या बाबतीत त्यांचे चित्त एकदम हलके व दृतगतीने कार्य करणारे असले तरी प्रत्येक बुद्धाच्या भूमिकेत जड व मंद गतीनेच त्याला कार्ये करावी लागतात._


*_क्रमशः_*         

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...