Monday, 13 September 2021

अनागामी व्यक्तीचे चित्त

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                  *_सात प्रकारचे चित्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼         

          *_मनुष्यात वसणारे सात प्रकारचे चित्त पाहण्यात येतात ते असे -_*

*१)* सक्लेश म्हणजे चिकटलेले आहे असे

*२)* श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त

*३)* सकृदागामी व्यक्तीचे चित्त

*४)* अनागामी व्यक्तीचे चित्त

*५)* अर्हत व्यक्तीचे चित्त

*६)* प्रत्येक बुद्धाचे चित्त

*७)* सम्यक संबुद्धाचे चित्त


*४) अनागामी व्यक्तीचे चित्त*

                  *_"ज्यांनी अनागामी नावाची वरची अवस्था गाठली, त्यांचे पाच बंधन आपोआप गळून पडतात आणि जीवनाच्या दहा अवस्थांपर्यंत त्यांचे चित्त एकदम साफ झालेले असते. म्हणून येथपर्यंत विचारशक्ती सुलभतेने व तत्परतेने कार्य करीत असे. परंतु याहीपेक्षा वरच्या भूमीत चित्तास कार्ये करावयास बऱ्याच अडचणी येतात. कारण येथे चित्तजड आणि मंद असते, का की दहा स्थानांपर्यंत चित्त एकदम परिशुद्ध झाले असले तरीपण वरच्या अवस्थेत क्लेश (चित्त मळ) अजून अवशिष्ट असतात."_*      

    _उदा. ज्याप्रमाणे वेळवांच्या रांजीतील वेळू कापून काढत असता दहा पेरांपर्यंत समस्त शाखा  प्रशाखा  तोडल्यामुळे तिथपर्यंत ओढून काढावयास मुळीच कठीन जाणार नाही. परंतु वरच्या शाखा प्रशाखा अजून रांजीत परस्परांत गुंतून असल्यामुळे तो भाग ओढून काढण्यास बरीच अडचण जाते. कां की, वेळू खाली दहा पेरांपर्यंत साफ केलेला असला तरी उरलेला वरचा भाग साफ न करता असाच सोडून देण्यात आला आहे._

              *_"याप्रमाणेच अनागामी अवस्था प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचे चैतसिक दहा स्थानांपर्यंत चित्त दृतगतीने कार्य करण्यास त्यास कठीण जात नाही, परंतु यापेक्षा वरच्या भूमीत अत्यंत कठीण व मंद गतीने कार्य करणे भाग पडते. का की, दहा स्थानापर्यंत चित्त एकदमच परिशुद्ध झालेले असले तरी बाकीच्या वरच्या अवस्थांत अजून क्लेश शिल्लक राहिलेले आहेत असे अनागामीपदाचा लाभ करणारे व्यक्ती पुनः मानवी जगात कधीही येत नाही."_*


  *_क्रमशः_*         

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*             

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

योग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_योग_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_19.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _भगवंतांनी संबोधी मार्गा...