🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_माणसाची अधोगती कशाने होते?_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_गौतमा, मी तुला अधःपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे. कृपा करून अधःपतनाची कारणे काय असतात ते मला सांग!'_*
*भगवंतांनी सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले :*
*_'कोणाची उन्नती होत आहे आणि कोन अघोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे. धर्मप्रेमी हा उन्नतपथावर, तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे हे अधोगतीचे / अधःपतनाचे पहिले कारण होय._**
*_'अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्याची दुर्गुणी माणसांवर श्रद्धा असते हे त्याच्या अधोगतीचे / अधःपतनाचे दुसरे कारण होय._*
*_'झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधाविष्टता ही सर्व अधोगतीचे / अधःपतनाचे तिसरे कारण होय._*
*_आईबाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालनपोषण न करणे अधोगतीचे / अधःपतनाचे चौथे कारण होय._*
*_'ब्राह्मण, श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठकविणे हे अधोगतीचे / अधःपतनाचे पाचवे कारण होय._*
*_'जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अधोगतीचे / अधःपतनाचे सहावे कारण होय._*
*_'आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अधोगतीचे / अधःपतनाचे सातवे कारण होय._*
*_'व्यभिचार, मध्यपान, जुगार यांमध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधोगतीचे / अधःपतनाचे आठवे कारण होय._*
*_'स्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्रीया यांचा समागम करणे हे अधोगतीचे / अधःपतनाचे नववे कारण होय._*
*_'जो गतयौवन (वयातील) पुरुष तींबरु वृक्षाच्या फळाप्रमाणे (लहान) स्तन असलेल्या (तरुण) स्त्रीशी लग्न करतो व तिच्या ईर्षेने झोपत नाही हे अधोगतीचे / अधःपतनाचे दहावे कारण होय._*
*_'असंयमी, उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधोगतीचे / अधःपतनाचे अकरावे कारण होय._*
*_'जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला, या जोरावर अफाट महत्वकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधोगतीचे / अधःपतनाचे बारावे कारण होय._*
*_'हे कुलोत्तम देवा, ही सर्व अधःपाताची कारणे आहेत. या सर्वांवर विजय मिळवलास तरच तू वाचशील.'_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment