Tuesday, 10 August 2021

पती आणि पत्नी

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

   *_पती आणि पत्नी_*

    🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

     एकदा भगवंत मदुरा आणि निरंजना यांच्यामधील राजरस्त्याने चालले होते. या रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या. तेव्हा भगवंतांनी रस्त्या सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले. गृहस्थ आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले. ते सर्व भगवंतांजवळ आले. त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि जवळच बसून त्यांना विचारले, *'पती-पत्नीतील सुयोग्य संबंध कोणता?*' यावर भगवंतांनी उत्तर दिले,

*हे गृहस्थ हो, पति-पत्नींना चार प्रकारे एकत्र राहता येते.* 

           _दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल_

           _दुष्ट पुरुष देवतेबरोबर राहत असेल_

            _सत् पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल_

           _सत् पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्रीबरोबर राहत असेल_

          *हे गृहस्थ हो! दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असत्भाषण, मद्यपान, दुष्ट आणि पापी वर्तणूक, मोहाविष्ट मन आणि सत्पुरुषांची निंदा याने भरलेले असते आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असते. अशा प्रकारे सद्गृहस्थ हो, दृष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर जीवन व्यतीत करीत असतो.'*

       *'गृहस्थ हो! दुष्ट पती आणि देवतातुल्य पत्नी यांच्या जीवनात पती वर सांगितल्याप्रमाणे वर्तत असतो. परंतु पत्नी हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यांपासून परावृत्त असते. तिची वर्तणूक सद्गुणी आणि हितकर असते. अंतःकरण मोहाधिन नसते. ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसांची निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. त्याप्रमाणे गृहस्थ हो, दुष्ट मनुष्य देवतातुल्य पत्नीसह राहत असतो.*

       *गृहस्थ हो सज्जन, देवतुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते. या जीवनात पती हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यांपासून परावृत्त होऊन राहतो. त्याची वागणूक गुणयुक्त व हितकर असते. मोहाधिन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषांची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. परंतु त्याची पत्नी मात्र वर वर्णिलेल्या दुष्ट स्त्रीसारखी वागत असते.*

         *गृहस्थ हो, चौथ्या प्रकारची पती-पत्नी जीवनात जणू काय देव, देवतेबरोबर राहत आहे अशी वागतात. कारण ते दोघेही पती-पत्नी हत्या, चोर्यकर्म, असत्य-भाषण, व्यभिचार, मद्यपान यांचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाहीत आणि मोहाधिन होऊन सत्पुरुषांच्या निंदेने आपली जीभ विटाळीत नाहीत.*

*हो, पती-पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे चार प्रकार आहेत._*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...