Thursday, 6 May 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ६९

 *_प्रश्न ६९ - कुंडलिनी जागृतीमुळे वा योगिक शक्तीमुळे काही सिद्धी वा चमत्कार करण्याचे सामर्थ्य ह्या गोष्टी प्राप्त होतात, हे खरे आहे काय?_* 



 *उत्तर*  👉  कुंडलिनी जागृतीने सिद्धी प्राप्त होते व योगशक्तीने चमत्कार घडवता येतात हा दावा अनेकांकडून केला जातो. परंतु तो पूर्णपणे चुकीचा आहे. अशा स्वरूपाची कोणतीही बाब आजपर्यंत भारतात वा अन्यत्र कोठेही प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध झालेली नाही. 


योगशक्तीने 

१.हवेत तरंगणे, 

२.हृदयाचे ठोके पाच मिनिटे बंद करणे, 

३.तीन मिनिटे श्वास बंद करणे, 

४.ज्ञानप्राप्ती करून दाखविणे अथवा विचारशक्ति विकसित करणे

      *हे चमत्कार करणाऱ्यास अब्राहम कोवूरचे एक लाखांचे आव्हान होते.*

      

        नागपूरला पायलट बाबा योग-सामर्थ्याने हृदयाचे ठोके बंद करण्याचा दावा करत होता. नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी आव्हान देताच पायलट बाबा पळाला. *कुंडलिनी जागृतीमुळे सिद्धी प्राप्त होतात ही अंधश्रद्धा होय!* वैज्ञानिक सत्य नव्हे. कुण्डलिनी जागृत करुन सिद्धी प्राप्त झालेले ३०० वर्षे वयाचे योगी हिमालयात वास्तव्य करुन आहेत. ते काचा-खिळे पचवू शकतात. विष पचवतात, हवेत तरंगतात, एकाएकी गुप्त होऊन दुसरीकडे अवतीर्ण होतात हा प्रचार अवास्तव आहे. आधुनिक वैद्यकीय शास्त्रात कुंडलिनीला अस्तित्व नाही. *तरीही कुंडलिनी जागृतीच्या आधारे काही सिध्दींचे अस्तित्व सिद्ध करता येते व योग समर्थ्यामुळे चमत्कार घडवता येतात असा कोणाचा दावा असल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याची चाचणी घेण्यास सदैव तैयार आहे.*


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार.* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...