Friday, 21 May 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ८४

 *_प्रश्न ८४ – झोपेत कु णीतरी छातीवर बसलेले आहे असे वाटते; छाती धडधडते, असे का होते?_*


*उत्तर 👉*  *याची दोन कारणे संभवतात १. शारिरीक, २. मानिसक.*


*१.* आपल्या उदरपोकळीवर पडदा (डायफ्रेम) असतो. अपचन, गॅस, इत्यादी कारणांनी या पटलावर दाब पडतो. हा दाब छातीत जाणवतो व छातीवर दडपण आल्याने छाती धडधडते .

*माणसाला अनेकदा चुकीच्या सवयी लागलेल्या असतात. चुकीच्या पद्धतीने (Bad Posture) बसल्याने पाठीच्या कण्यावर दाब येऊन कण्याचे व पाठीच्या स्नायूचे विकार संभवतात. अशा प्रकारच्या चुकीच्या झोपण्याच्या सवयीमुळे छातीवर दाब येऊ शकेल व झोपण्याच्या पद्धतीत आपले चुकले आहे, लक्षात न आल्याने छातीवर कोणीतरी बसल्याचा भ्रम होईल.*


*२.* कधी कधी दिवसभर जे विचार मनात येतात ते स्वप्नातही येतात. कोणाशी तरी मारामारी झाली असेल अगर होईल अशी भीती वाटत असेल, तर असे मारमारीचे दृश्य स्वप्नात येईल. स्वप्नातील या दृशात आपल्या छातीवर कोणी व्यक्ती बसली आहे असे दिसेल. पण माणसाला सर्व स्वप्ने आठवतात असे नाही. बरीच स्वप्ने आठवत नाहीत. त्यामुळे स्वप्नावस्थेतून बाहेर आल्यावर स्वप्न न आठवता फक्त कोणीतरी छाती दाबत असल्याची भावना होणे सहज शक्य आहे.


या संदर्भात माझाच अनुभव येथे देण्यासारखा आहे. मी निफाड (जि.नाशिक) येथील कॉलेजात परीक्षेच्या कामासाठी सिनयर सुपरवायझर म्हणून गेलो होतो. परीक्षा केंद्र असलेले कॉलेज गावापासनू दूर माळावर होते. जोडीदार नाशिकचे होते. ते नाशिकला परीक्षा चालू असताना ज्या दिवशी गेले, त्या दिवशी कॉलेजच्या रुममध्ये मला एकट्याला रात्री मुक्काम करावा लागला. आधीचे दोन दिवस भरपरू कॉपी प्रकरणे पकडली होती. तिथल्या प्राध्यापकांनी सावध राहण्याचा सल्ला दिला होता.

             उकाड्यामुळे कॉलेजच्या मैदानात एकटाच झोपलो असताना छातीवर कोणीतरी बसल्याचा भास झाला; ताडकन जाग आली. २ मिनटे हालता येईना. कसा तरी उठलो. कोणीही जवळपास नसल्याची खात्री  केली. एकटेपणा व दिवसभराच्या घटनांचा परिणाम असावा. हे लक्षात येऊन परत कॉलेजच्या व्हरांड्यात आलो. दोन शिपाई तोपर्यंत आले होते. त्यांच्या शेजारी झोपलो. *मनी वसे ते स्वप्नी दिसे हेच या मागचे कारण होते हे वाचकांच्या लक्षात येईल.*


*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*


https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...