Saturday, 22 May 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ८५

 *_प्रश्न ८५ – अनेक चमत्कारांनी भरलेले जग कसे निर्माण झाले? आधी कोंबडी कि आधी अंडे?_*


*उत्तर 👉* कोंबडीचा जन्म अंडयातनू होतो. प्रथम अंडे तयार झाले असे म्हणावे, तर अंडे घालायला अगोदर कोंबडी पाहिजे, प्रथम कोंबडी तयार झाली असे म्हणावे तर, अंडयाशिवाय कोंबडी कशी तयार झाली ?


             हाच प्रश्न अंडी न घालणाऱ्या पण पिल्लांना जन्म देणाऱ्या प्राणी व मानव यांच्या बाबतीत विचारता येईल. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला जन्माला घालतो. पहिला प्राणी कसा निर्माण झाला? पहिला मानव कसा निर्माण झाला? वनस्पती सृष्टीबाबत आधी एक झाड, का आधी बी असे या प्रश्नाचे स्वरूप आहे.


                 वरील स्वप्न साररूपाने एकत्र करता येतील. पृथ्वीवर प्राणी, वनस्पती इत्यादी म्हणजे जीवसृष्टी कशी निर्माण झाली व केव्हा निर्माण झाली? याच्याही पुढे जाऊन एवढी विविधता धारण केलेली पृथ्वी कशी व केव्हा निर्माण झाले?


               वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न फार पुर्वीपासनू मानव करीत आला आहे. पहिला प्रयत्न म्हणजे विविध धर्मातील  तत्वज्ञांनी मांडलेल्या कल्पना. परमेश्वराने जीवसृष्टी व विश्वाची निर्मिती केली असे सर्व धर्म सांगतात. पण धर्म मार्तंडांच्या या कल्पना म्हणजे ६ आंधळे व एक हत्ती या कथेतला प्रकार होय. सहा आंधळ्यांनी हत्तीच्या विविध अवयवांना स्पर्श केला व प्रत्येक जण हत्तीचे वर्णन दुसऱ्याला सांगू लागला. शेपटाला स्पर्श केलेला अंधळा म्हणाला, 'हत्ती दोरीसारखा आहे,' कानाला स्पर्श केलेला अंधळा ओरडला, 'हत्ती सुपासारखा आहे,' सोंडेला स्पर्श केलेल्या आंधळ्याच्या मते हत्ती अजगरासारखा असला पाहिजे. _बायबलमध्ये परमेश्वराने ६ दिवसांत सृष्टी निर्माण केली असे वर्णन. हिंदू धर्मग्रंथात वेगळीच कल्पना. अॅडम व इव्ह ही पुरुष-स्त्रीची जोडी स्वर्गातून पृथ्वीवर आली व त्यांच्यापासनू मानव पुनरुत्पादीत होत राहिला असे बायबल सांगते, तर मनुपासनू मानवसृष्टी बनली असे हिंदुधर्म सांगतो. ब्रह्माच्या डोक्यापासनू ब्राह्मण, पायापासनू शुद्र निर्माण झाले. पृथ्वी शेषाने धरली आहे, विवीध धर्मातील विश्व, पृथ्वी व जीवसृष्टी यांच्या निर्मितीच्या कल्पना वेगवेगळ्या, कशाचा कशाला मेळ नाही, कुठेही संगती नाही. कोणत्याही गोष्टीला कसलाही पुरावा नाही._


            *जीवसृष्टी ही परमेश्वराची निर्मिती (Special creation) आहे. ही उपपत्ती कोणाही बुद्धीमान माणसाला पटणार नाही, याचे कारण 'खास निर्मिती' ही केवळ कल्पना आहे. सत्य नव्हे.*


             बंद कणगीत बाहेरून शिरकाव करण्यास वाव नसताना धान्यात एकाएकि किडे कसे तयार होतात? पहिला पाऊस पडला कि एकाएकि बेडूक दिसायला लागतात. या व अशा प्रकारच्या इतर निरीक्षणातून, निर्जीव पदार्थांपासून सजीव निसर्गतः स्वाभाविकपणे  तयार होत असावेत, अशी दूसरी उपपत्ती पुढे आली. इजिप्तमध्ये नाईल नदीच्या चिखलापासनू सुसर तयार होते, असे मानले जाते. विंचू आणि माश्या शेणापासनू तयार होतात अशी कल्पना होती. या उपपत्तीला (Spontaneous creation) स्वाभाविक निर्मिती म्हणतात.१९ व्या शतकाच्या उतर्राधापर्यंत स्वाभाविक उपपत्तीला उत्तर नव्हते. *इटालियन डॉक्टर  रेडी  sp^लनाझिनी, फ्रेंच रसायनतज्ञ पाश्वर यांच्या प्रयोगांनी स्वाभाविक निर्मीतीची उपपत्ती चुकीची असल्याचे सिद्ध झाले.* कुजणाऱ्या मांसात ज्या अळया दिसतात त्या मांसापासनू बनत नाहीत, तर मांसात असलेल्या सूक्ष्म अंडयांपासनू तयार होतात. ही अंडी हवा, पाणी यांच्याद्वारे अगर मुळातच मांसात असतात; ती डोळ्यांना दिसत नाहीत. मांस उकळून सीलबंद भांड्यात ठेवले तर त्यांच्यात अळया होत नाहीत, हे रेडीने दाखवनू दिले. रेडी, पाश्वरच्या प्रयोगांनी स्वाभाविक  निर्मितीची कल्पना मागे पडली.


*_आज अस्तित्वात असलेल्या विविधरूपी वनस्पती व प्राणी सृष्टीच्या निर्मितीची विश्वसनीय उपपत्ती इंग्लिश जीवशास्त्रज्ञ डार्विन याने दिली. बीगल जहाजावरून त्याने विवीध देशांच्या सफरी करून, नानाविध वनस्पती व प्राणी-जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण केले. या निरीक्षणाची संगती लावताना उक्रांतीची कल्पना त्याला सुचली._*


*डार्विनच्या उत्क्रांतीवादाने आधी कोंबडी कि आधी अंडे, या प्रश्नाचे उत्तर आपणास मिळाले आहे. उत्क्रांती तत्वाप्रमाणे अनेक दशलक्ष वर्षापूर्वी एकपेशी जीव पृथ्वीतलावर निर्माण झाले. या एकपेशी जीवामध्ये हळूहळू बदल होत जाऊन आज दृष्टीस पडणारी प्राणी व वनस्पती सृष्टी आकाराला आली. ४०० दशलक्ष वर्षापूर्वी पहिला पाठीचा कणा असलेला आदीमच्छ निर्माण झाला. त्याच्यात हळूहळू बदल होऊन मासे तयार झाले, माशांपासनू बेडकांसारखे उभयचर प्राणी, उभयचर प्राण्यांपासनू महाकाय सरपटणारे प्राणी, या त्यांच्यापासनू पक्षी व सस्तन प्राणी विकास पावले. सस्तन प्रण्याची एक शाखा माकडाची; माकडामध्ये उत्क्रांती होऊन मानव निर्माण झाला. पृथ्वीतलावर आदिजीव कसे निर्माण झाले या कोडयाचे उत्तर सुटले आहे. विज्ञानातील अलीकडच्या संशोधनाचा निष्कर्ष असा-*


           *_अंदाजे ५००० दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वी निर्माण झाली. ३००० दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वीवर सागर तयार झाले. या पाण्यात शर्करा, अॅमिनो अॅसिडपासनू मोटीनचे रेणू बनले. न्यूक्लिक अॅसिडस तयार झाली. न्यूक्लिक अॅसिड व प्रोटीन्स यांच्या संयोगातनू जीन्स व व्हायरस निर्माण झाले. पुढचा टप्पा म्हणजे यातनू बॅकटेरिया अल्गी अमीबासारखे एकपेशी प्राणी निर्माण होण्याचा. हेच आदिजीव आपले सर्वांचे पूर्वज._*


          *_प्रत्येक जिवंत प्राण्याच्या पेशीत असलेली अॅमिनो अॅसिडस् इक अॅसिडस् व न्यूक्लिक अॅसिडस् ही त्याची मूळ घटक असलेल्या अमोनिया, मिथेन व पाणी यांच्या संयोगातनू निर्माण करता येतात, हे मिलर या अमेरिकन वैज्ञांनीकाने दाखवनू दिले. हा अचेतन वस्तुपासनू सचेतन सृष्टी निर्माण झाली याचा पुरावा होय._*


         *पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे कसे निर्माण झाले या प्रश्नाचे उत्तर खगोल वैज्ञानिकांनी दिले आहे. विश्वाच्या निर्मितीच्या दोन उपपत्ती सांगितल्या जातात. एक स्टेडी टेस्ट उपपत्ती, दुसरी बिग बँग उपपत्ती. या उपपत्तीच्या खोलात जाण्याची आपल्याला प्रश्नांच्या उत्तरासाठी गरज नाही. एवढे मात्र खरे, की विश्वाच्या निर्मितीच्या आरंभी हायड्रोजन वायूचे प्रचंड ढग अवकाशात फिरत होते. अपघाताने या अनुकणांची पॅकेट तयार झाली. गुरुत्वाकर्षनाने पॅकट संकोच पावून त्यापासून तारे बनले. तार्यांच्या अंतरंगात हायड्रोजनच्या फ्युजनमधून इतर मूलद्रव्ये तयार झाली. तार्याच्या स्फोटातनू ही द्रव्ये आकाशात विखुरली गेली. त्याच्यापासनू सूर्यांसारखे नवीन तारे जन्माला आले. पृथ्वी सूर्यापासून तयार झाली. पृथ्वीवर जीवांचा  विकास कसा झाला, हे आपण वर पाहिलेच आहे.*


अशा रीतीने एकपाठोपाठ सातत्याने घडत गेलेल्या घटना हायड्रोजन ढग, ताऱ्यांची निर्मिती व मृत्यू, सूर्य व पृथ्वीचा जन्म, जीवनाचा पृथ्वीवर उदय व अखेर जीवांमध्ये उत्क्रांती होत प्राणी, मानव, कोंबडी इत्यांदीचा विकास असा आपल्या निर्मितीचा क्रम आहे.


_'We are brothers of the boulders, cousins of the clouds.' -Harlow Shapely.

'आम्ही सगेसोयरे खडक ढगांचे'_


*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*


https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

योग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_योग_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_19.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _भगवंतांनी संबोधी मार्गा...