Wednesday, 19 May 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ८२

 *_प्रश्न ८२ –_* 

*_अ) साप म्हशीच्या पायाला विळखा घालनू दूध पितो, हे खरे काय?_*

*_ब) पुंगी वाजवल्यावर साप बिळातनू बाहेर येतो व डोलू लागतो असे म्हणतात. याबाबत आपले मत काय?_*

*_क) साप शंभर वर्षाचा झाल्यास आपले रुप बदलनू दूसरे कुठलेही रुप घेतो, असे आम्ही सिनेमात पाहतो._*

*_यामागचे सत्य काय?_*

*_ड) नागाच्या डोक्यावर मणी असतो व तो अंधारात चमकतो हे खरे आहे का?_*


*उत्तर 👉*

 अ) दूध हे सस्तन प्राण्याचे अन्न आहे. साप हा सरपटणारा प्राणी आहे. दूध हे त्याचे अन्न नाही. तो फक्त मांसाहारी आहे. त्याला मारून टाकलेले भक्ष चालत नाही. सापाला पाणी न दिल्यास दुधाला पाणी समजनू ते तो नुसताच चाटतो. रानात वा गोठ्यात साप गाई-म्हशीच्या पायाला विळखा घालनू त्यांचे दूध पिण्याची शक्यताच नाही.


ब) सापाला कान नसतात. त्याला फक्त जमिनीतून होणारी कंपने जाणवतात व चाहुल लागते. त्यामुळे नुसती पुंगी वाजवून नाग डोलत नाही. गारुडी पुंगी वाजिवताना पुंगी हालवतो. हालत्या वस्तूचा वेध घेणे, ही सापाला निसर्गाने दिलेली देणगी आहे. त्यामुळे हालणार्या पुंगीचा तो वेध घेताना डोलल्यासारखा भासतो. प्रत्यक्षात गारुड्याला पुंगी न हालवता वाजवायला सांगितल्यास किंवा साप व पुंगीवाला यांच्यामध्ये एखादा पडदा धरल्यास तो डोलत तर नाहीच नाही पण साधा फणाही काढत नाही.


क) साप शंभर वर्षाचा झाल्यास रूप  बदलतो हीकल्पना अनेक गल्लाभरू सिने-दिग्दर्शकांनीवापरून आपला फायदा करून घेतला आहे. सापाचे आयुष्य ५ ते ७ वर्षे असते. त्यामुळे शंभर वर्षांनी साप रूप बदलतो, ही कल्पना मूर्खपणाची आहे. 


ड) नागाच्या डोक्यावर कसलाही मणी नसतो. आतापर्यंत ज्या-ज्या लोकांनी आपणाकडे असा सर्पमणी आहे असा दावा केला, त्यांचे मणी प्रत्यक्ष तपासणीनंतर हळदी-कुंकवाचे खडे किंवा सर्प विषाचे सुकलेले स्फटिककण आढळले.


*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*


https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...