*_प्रश्न ३९ - मोठमोठ्या
शहरांतसुद्धा ठिकठिकाणी पीर तयार होत आहेत. त्याचा ताबा धर्मवेड्या मुसलमानांकडे
जातो. तेथे ते गंडे, धुपारे करून
तरुण, बहुसंख्य हिंदू स्त्रियांना घुमायला
लावतात. यातील सत्यता काय?_*
*उत्तर-* 👉 वरील प्रश्न ऐकीव खोट्या माहितीवर आधारलेला वाटतो. माहिती गोळा केली, तर अशा तऱ्हेचे पीर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत हे सत्य नाही. ज्या ठिकाणी स्त्रियांच्या अंगात येते अशी ठिकाणे हिंदूंचीही आहेत. नांदेड जिल्ह्यातील भानामती अंगात येणारी गावेच्या गावे आहेत. गाणगापूर हे तर अंगात येणाऱ्या व भुताने झपाटलेल्या व्यक्तींवर इलाज करण्याचे हिंदूंचे फार मोठे क्षेत्र आहे. तरुण स्त्रियांना घुमायला लावणारे जसे मुस्लिम मांत्रिक आहेत, तसेच हिंदू पुजारी, देवऋषी आहेत. *स्त्रियांचे योनीशोषण करण्यास जातधर्म आडवा येत नाही. इथे सर्वधर्मसमभाव स्वीकारला जातो.*
तरुण स्त्रियांना फसविण्याचा प्रकार पीराच्या ठिकाणी घडो अगर दर्ग्यात घडो अगर देवळात घडो, केव्हाही निंद्यच समजला पाहिजे. हे कुठेही घडो, त्याला मानवी दृष्टिकोनातूनच विरोध केला पाहिजे; विशिष्ट धर्माचा म्हणून नव्हे.
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment