*_प्रश्न ३१- अंगात येण्याचा प्रत्येक प्रकार ही लोकांची जाणूनबुजून केलेली फसवणूक असते काय?_*
*उत्तर* अंगात आलेली व्यक्ती-
१. फसवणूक करणारी ढोंगी असेल किंवा
२. ती मनोरुग्ण असेल
यावरून अंगात येणारी प्रत्येक व्यक्ती
ही जाणूनबुजून फसवणूक करणारी असते, असे समजणे हे
चूक ठरेल.
अंगात आलेली व्यक्ती फसवणूक करणारी
असेल, तर अशी व्यक्ती लुबाडणूकीचा धंदा सुरू
करते. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, प्रश्नांवर
उतारा सांगणे यामधून पैसा मिळतो. लोक पाया पडत्तात. प्रतिष्ठा मिळते.देवऋषी, दरबार भरवून प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या देव्या
या प्रकारात मोडतात. फसवणूक करणाऱ्या ढोंगी व्यक्तीने अंगात आणले, तर दोन थापडांत त्याचे अंगात येणे बंद होईल.
अशा व्यक्तीच्या हातावर जळता कापूर ठेवला अगर शरीराला आग आणणारी खाजखुजली त्यास
लावली तर त्याचे अंगातील झटकन बंद होते.
मागच्या प्रश्नात मानसिक संतुलन
ढळल्यामुले अंगात येण्याच्या प्रकाराचा तपशील दिला आहे. अशा व्यक्ती ढोंगी नसतात.
त्यांचे अंगात येणे बंद करण्यासाठी वरील उपाय करणे चूक ठरेल. *अशा मनोरुग्णांना मनोविकार
तज्ज्ञाकडे नेऊन उपचार करून घेतले पाहिजेत.*
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment