➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*झेन
कथा – कुतुहूल*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी
सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद
देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या
या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन
कथा.:-*_
_पहाडाच्या माथ्यावर अतिशय उंच
आणि धोकादायक टोकावर एक म्हातारा राहत असे. दररोज सकाळी डोंगराच्या टोकाच्या कडेला
बसून तो पहाडांचा आणि जंगलाच्या निसर्गदर्शनाचा आनंद घेत असे. असाच एक दिवस तो
टोकावर बसलेला असताना त्याला खाली एक चकाकती वस्तू दिसली. ती दरीत खूप खोल होती.
त्याने टक लावून पहिले. एक सोन्याचा तुकडा चकाकत होता. त्याला प्रश्न पडला – हे
कुठून आले? कि माझ्या आतच होते?
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - झेनकथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*०५/०२/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment