Friday, 5 February 2021

शत्रु लहान म्हणून त्याचें कौतुक करूं नये

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*_शत्रु लहान म्हणून त्याचें कौतुक करूं नये_*

*_(पलास जातककथा)_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

                                                    _बोधिसत्त्व एका जन्मीं सुवर्णहंस होऊन हिमालयावर रहात असेतो ज्यावेळीं चरावयास जात असे त्यावेळीं वाटेंत एका पलाश वृक्षाखाली विश्रांतीसाठीं बसत असेरोजच्या संवयीमुळें त्या पळसाच्या झाडावर त्याचें फार प्रेम बसलेंएके दिवशीं एका पक्ष्यानें वडाचीं फळें खाऊन त्या पळसाच्या झाडाच्या दोन फांद्यांमध्यें देहधर्म केलापावसाळ्यांत त्या ठिकाणीं वडाचा रोप रुजून आलात्याचीं तीं कोमल पानें पाहून पलाशदेवता मोठें कौतुक करूं लागलीहंस जेव्हां त्या ठिकाणीं विश्रांतीसाठीं आला तेव्हां त्यालादेखील तिनें या वडाच्या नवीन रोपाचें मोठें कौतुक सांगितलेंतेव्हां हंस पलाशदेवतेला म्हणाला, ''बाई याचें तूं कौतूक करूं नकोसतूं या ठिकाणींच स्थिर असल्यामुळे वडाचें झाड कसें असतें याची तुला कल्पना नाहींयाला जर वाढूं दिलेंस तर हा वृक्ष तुझें समूळ निर्मूलन करून टाकील मग तुला आपल्या प्रेमाचा भयंकर पश्चात्ताप करावा लागेल.''_


                             _पलाशदेवता म्हणाली, ''तें कांहीं असोसध्यां तरी मला याजपासून कांहींच त्रास होत नाहींबिचार्यानें माझा आश्रय केला असल्यामुळें त्याच्यावर माझें मातृवत् प्रेम जडलें आहेतेव्हां त्याचें उच्चाटण मी कसें करावें ?''_


                                    _हंस म्हणाला, ''मला जें काय वाटलें तें मी तुला सांगितलें आहेयावर तुझी मर्जीतथापि आणखी एकवार सांगतों कींया रोपाची वृद्धि तुझ्या नाशाला कारण होईल.''_


_असें बोलून हंस पलाशाची मैत्री सोडून दुसरीकडे चालता झाला._


                                       _इकडे हळूहळू वडाचा रोप वाढत गेला त्याने त्या पलाशाच्या झाडाला म्हणजे पलाशदेवतेच्या निवासस्थानाला पूर्णपणें ग्रासून टाकलें ! तेव्हां पलाशदेवता म्हणाली, ''हंस जें सांगत होता तें खोटें नाहीं*जो वृद्धि पावत असतां आपल्या आश्रयदात्यांचाच नाश करून टाकतोत्याला आश्रय देणें आणि त्यावर प्रेम करणें सर्वथैव अनिष्ट होय.''*_

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*संदर्भ : - जातक कथा संग्रह*

*संकलन :- महेश कांबळे*

*०६/०२/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

नवसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 "नवसुत्तं" https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_20.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _...