Monday, 1 February 2021

रोहिणी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*६७ रोहिणी*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖    

          



  _वैशालीमधील एका वैभवशाली ब्राह्मण कुटुंबात रोहिणीचा जन्म झाला होता. भगवान बुद्ध वैशालीत विहार करीत असताना तिने त्यांचा धम्मोपदेश ऐकला. त्यामुळे रोहिणीला धम्माप्रती श्रद्धा निर्माण झाली. बौद्धांच्या संघाबद्दल तिला अतिशय आकर्षण वाटत असे. आई-वडिलांना एकेदिवशी उपदेश केला आणि त्यांची परवानगी मिळविली. त्यानंतर तिने भिक्खुणीसंघात प्रवेश केला. प्ररीश्रमपूर्वक साधना करून तिने थोड्याच दिवसात अर्हतपद मिळविले. *”मला भिक्खू संघ का आवडतो” ह्याचे तिने वडिलांना उत्तर दिले. अशाप्रकारे वडिलांशी झालेला तिचा संवाद खालीलप्रमाणे मांडलेला आहे. :-_

  

          *_”हे रोहिणी! श्रमणांचे नाव घेऊन तू निजतेस, श्रमणांचे नाव घेऊन तू जागी होतेस अशाप्रकारे तू प्रत्येकवेळी श्रमणांचे गुण करतेस. तू निश्चित श्रमणी होशील. ||२७१||_*


            *_तू श्रमणांचे पुष्कळ अन्नपानाचे दान करतेस. हे रोहिणी, मी आता विचारतो, तुला श्रमण कशामुळे प्रिय आहेत?’ ||२७२||_*


          *_हे श्रमण काम करण्यास तयार नसलेले, आळशी, दुसर्‍याच्या दानावर जगणारे, लोभी व स्वादिष्ट भोजनाची ईच्छा करणारे आहेत. असे असताही तुला श्रमण कशामुळे प्रिय आहेत?” ||२७३||_*


           *_”हे बाबा! तुम्ही श्रमणांच्या बाबतीत पुष्कळ वेळापासून मला विचारात आहात. मी आज त्यांची प्रज्ञा, शील आणि त्यांचा पराक्रम ह्यांचे वर्णन करते. ||२७४||_*


           *_श्रमण कर्म करू इच्छिणारे, अनाळशी व श्रेष्ठ कर्म करणारे आहेत. राग आणि द्वेष ह्यांचा ते त्याग करतात. ह्यामुळे माला श्रमण प्रिय आहेत. ||२७५||_*


          *_ते शुद्ध कर्म करणारे असून तिन्ही पापांची मुळे (कायिक, वाचिक व मानसिक) नष्ट करतात. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे. ह्यामुळे मला श्रमण प्रिय आहेत. ||२७६||_*


        *_त्यांचे कायिक कर्म शुद्ध आहे. वाचिक कर्मसुद्धा तशाप्रकारे शुद्ध आहे आणि त्यांचे मनोकर्मसुद्धा शुद्ध आहे. ह्यामुळे मला श्रमण प्रिय आहेत. ||२७७||_*


         *_शंख आणि मोत्याप्रमाणे ते निर्मळ आहेत. आतून व बाहेरून ते शुद्ध आहेत. सद्गुनांनी ते परिपूर्ण आहेत. ह्यामुळे मला श्रमण प्रिय आहेत. ||२७८||_*


         *_ते बहुश्रुत, धम्मधर, आर्य जीवन जगणारे, धम्म आणि धम्माचा अर्थ ह्यांचा उपदेश करतात. ह्यामुळे मला श्रमण प्रिय आहेत. ||२७९||_*     


         *_ ते बहुश्रुत, धम्मधर, आर्य जीवन जगणारे, एकाग्रचित्त आणि स्मृतिमान आहेत. ह्यामुळे मला श्रमण प्रिय आहेत. ||२८०||_* 


         *_ते दूर जंगलापर्यंत जाणारे, स्मृतिमान, शहानपणाचे बोल बोलणारे, स्थिर चित्त असलेले आहेत. ते दुःखाचा अंत जाणतात. ह्यामुळे मला श्रमण प्रिय आहेत. ||२८१||_*


         *_ज्या गावातून जातात तिकडे कसलीही अपेक्षा ठेवून अवलोकन करीत नाहीत. अनपेक्ष होऊनच जातात. ह्यामुळे मला श्रमण प्रिय आहेत. ||२८२||_*


        *_जवळच्या वस्तु ते कोष्टागारात किंवा मडक्यात, किंवा टोपलीत ठेवून संचय करीत नाहीत. शिजवून तयार झालेले अन्न ते शोधतात. ह्यामुळे मला श्रमण प्रिय आहेत. ||२८३||_*


        *_ते सोने, नाणे अथवा रुपे ग्रहण करीत नाहीत. भूत भविष्याची चिंता न करता वर्तमानकाळात जे मिळेल त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. ह्यामुळे मला श्रमण प्रिय आहेत. ||२८४||_*


        *_वेगवेगळ्या कुळातुन, वेगवेगळ्या जंनपदातून ते प्रव्रजित झाले आहेत. असे असूनसुद्धा ते एकेमेकांबरोबर प्रेमाने राहतात. ह्यामुळे मला श्रमण प्रिय आहेत. ||२८५||_*


       *_”हे रोहिणी! तू आमच्या कल्याणाकरिता या घरात जन्म घेतला आहेस. बुद्ध, धम्म आणि संघाप्रती तुझा आदर अतिशय गौरवास्पद आहे. ||२८६||_*


       *_संघ हा दान देण्यायोग्य असे श्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे हे तू जाणतेस. हे श्रमण आमची ही दक्षिणा घेतील. येथे एकदा दान यज्ञ सुरू केला म्हणजे आम्हाला विपुल फळ-प्राप्ती होईल.” ||२८७||_*


       *_”जर तुम्ही दुःखाला भीत असाल, जर तुम्हाला दुःख अप्रिय असेल, तर तुम्ही बुद्ध, धम्म आणि कोणत्याही परिस्थितित समता ढळु न देणार्‍यांच्या संघाला शरण जा. तसेच पंचशील ग्रहण करा. ते तुमच्या कल्याणाकरिता होईल. ||२८८||_*


      *_”मी बुद्ध, धम्म आणि कोणत्याही परिस्थितित समता ढळु न देणार्‍यांच्या संघाला शरण जातो. तसेच पंचशील ग्रहण करतो. ते माझ्या कल्याणाकरिता होईल. ||२८९||_*


     *_मी पूर्वी ब्रह्मबंधु होतो, आता मात्र मी खरा ब्राह्मण आहे. मी त्रैविध्य श्रोत्रिय, वेद जाणणारा आणि स्नातक आहे.” ||२९०||_*

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*संदर्भ: - थेरिगाथा*

*संकलन :- महेश कांबळे*

*०२/०२/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

  

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...