➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*झेन
कथा – ओळखपत्र*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी
सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद
देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या
असणार्या या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक
झेन कथा.:-*_
_गावातल्या एका प्रसिद्ध बोधिसत्त्वांकडे गावाचा महापौर गेला.
बोधिसत्त्वांना त्याच्या सहायकाने त्याची ओळख लिहिलेला कागद दाखवला. त्याच्यावर
लिहिले होते, “आर्हान, महापौर.”_
_बोधिसत्त्व सहायकाला म्हणाले, “त्याला येथून जायला सांग. माझं या
व्यक्तीसोबत काहीच काम नाहीये.”_
_सहायकाने दिलगिरी व्यक्त करत ते ओळखपत्र परत दिलं. आर्हान
म्हणाला, “ती माझीच चूक होती.” त्याने ओळखपत्रावरच महापौर अक्षर खोडून टाकलं आणि
सहायकाला म्हणाला, “आता परत हे दाखवून बघ,”_
_सहायकाने ते पत्र बोधिसत्त्वांना दाखवले. ते पाहून बोधिसत्त्व
म्हणाले, “अरे, आर्हान आलाय का? मला भेटायचंय या व्यक्तीला. पाठवून दे त्याला
आत.”_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - झेनकथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*०१/०२/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment