Friday, 18 December 2020

अड्ढ कासी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *२२ अड्ढ कासी* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _काशी देशातील एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी अड्ढ कासीचा जन्म झाला. परंतु काही कारणामुळे ती वेश्या झाली. "श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांचा उपदेश प्रत्यक्ष ग्रहण करावा" अशी तिची खूप इच्छा होती. परंतु दुसऱ्या वेश्यांनी तिच्या मार्गात अनेक अडचणी आणल्या, तेव्हा तिने भगवंतांजवळ एक दूत पाठविला आणि उपसंपदा / भिक्खूनिपदाची दिक्षा मिळविण्याकरिता भगवंतांना विनंती केली. भगवंतांनी तिची विनंती मान्य करून तिला उपसंपदा दिली. अशाप्रकारे मोठ्या कष्टाने उपसंपन्न झाल्यावर तिने लवकरच दिव्यज्ञान प्राप्त केले. अर्हतपद प्राप्त झाल्यावर तिने आनंदित होऊन पुढील उद्गार काढले :-_ *_काशी देशाचे जेवढे उत्पन्न होते तेवढेच उत्पन्न माझे होते. त्यापेक्षा कमी मूल्य घेऊन मी कोणत्याही मनुष्याला आपली सेवा देत नव्हते. ||२५||_* *_परंतु आज मी त्या सौन्दर्यापासून विरक्त झाले आहे. त्या मोहापासून मुक्त होऊन मी वैराग्यमुक्त झाले आहे. जन्म-मरणाच्या फेऱ्यात मी पुनःपुन्हा धावणार नाही. मी तीन विद्यांचा साक्षात्कार केला आणि भगवान बुद्धांच्या शासनाप्रमाणे आचरण केले आहे. ||२६||_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ: - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *१७/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...