Friday, 18 December 2020

सुमंगल-माता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *२१ सुमंगल-माता* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _श्रावस्तीमधील एका गरीब कुटुंबात जन्म झाला. बुरूडकाम करणार्‍या एका पुरुषाशी तिचा विवाह झाला. तिच्या पहिल्या मुलाचे नाव सुमंगल ठेवण्यात आले. तेव्हापासून तिला सुमंगल-माता असे म्हणू लागले. सुमंगलसुद्धा प्रसिद्ध भिकखू होऊन थोडयाच दिवसात त्याला अर्हत्वपद प्राप्त झाले. सुमंगल-माता प्रव्रजित झाल्यावर एके दिवशी आपल्या कष्टपूर्ण आणि दरिद्री सांसारिक जीवनाचे स्मरण करीत असताना तिच्या चित्तात अधिकच वैराग्य उत्पन्न झाले त्यामुळे अधिक जोमाने प्रयत्न करून तिने परमज्ञान प्राप्त केले. अर्हत्व प्राप्तीच्या आनंदाने तिच्या तोंडून खालील गाथा उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या :-_ *_अहो! मी मुक्त झाले आहे. माझी मुक्ति धन्य आहे. मी मुसळापासून मुक्त झाले आहे. तसेच निर्लज्ज पतिपासून व छत्र्या करण्याच्या कामापासून मुक्त झाले आहे. तसेच अन्न शिजविण्याच्या भांड्यालाही पाणसपाच्या दुर्गंग्ध येत आहे.!!२३!!_* *_परंतु आज मी राग व द्वेष नष्ट करून विहार करीत आहे. झाडाखाली जाऊन ‘अहो मी किती सुखी आहे’ अशा प्रकारे सुखाने ध्यान करीत आहे. !!२४!!_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ: - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *१६/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...