Friday, 11 December 2020

मंत्राचा दुरुपयोग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 *_मंत्राचा दुरुपयोग_* 
 *_(संजीव जातककथा)_* 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

                 _एकदा बोधिसत्त्व मोठा ज्ञानी होऊन तक्षशिला येथें पुष्कळ शिष्यांना शास्त्र शिकवीत असे. त्याचा एक संजीव नांवाचा आवडता शिष्य होता; त्याला मृतप्राण्याला जिवंत करण्याचा त्यानें एक मंत्र शिकविला. संजीवाला आपल्या मंत्राचा प्रयोग करून पाहण्याची फार घाई झाली होती. आपल्या सोबत्यांसह जंगलात लांकडें गोळा करण्यास गेला असतां एक मरून पडलेला वाघ त्यानें पाहिला, आणि तो म्हणाला, ''मित्रांनो, गुरूनें शिकविलेल्या मंत्राचा प्रयोग करून मी या वाघाला जिवंत करतों, व मेलेल्या प्राण्याला कसें जिवंत करतां येतें याचें तुम्हाला उदाहरण दाखवितों.''_ 

             _ते म्हणाले, ''मित्रा, जरा दम धर, आम्ही झाडावर चढून बसतों व तेथून तूं वाघाला कसा उठवितोस हे पाहतों.''_ 

             _ते झाडावर चढून बसल्यावर संजीवानें मंत्रप्रयोगाला सुरुवात केली, व खडे घेऊन तो वाघच्या अंगावर फेकुं लागला. मंत्रसमाप्ति झाल्याबरोबर मोठ्यानें किंकाळी फोडून वाघ त्याच्या अंगावर धांवला, आणि त्याला ठार मारून त्याचें प्रेत घेऊन दाट झाडींत पळून गेला, संजीवाच्या सोबत्यांनी घडलेली सर्व गोष्ट बोधिसत्त्वाला सांगितली. तेव्हां तो म्हणाला, ''मुलांनों, मंत्रप्रयोग करण्याची जो घाई करतो, व *वेळ अवेळ न पहातां भलत्याच प्रसंगी आपल्या सामर्थ्याचा उपयोग करतो त्याची संजीवाप्रमाणेंच गत होत असते हें लक्षांत ठेवा, आणि आपल्या सामर्थ्याचा योग्य प्रसंगींच उपयोग करीत जा.*''

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 *संदर्भ : - जातक कथा संग्रह* 
*संकलन :- महेश कांबळे* 
*१२/१२/२०२०* 
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...