Tuesday, 1 December 2020

५ तिस्सा (दुसरी), ६ धिरा, ७ वीरा, ८ मित्ता, ९ भद्दा, १० उपसमा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *५ तिस्सा (दुसरी), ६ धिरा, ७ वीरा, ८ मित्ता, ९ भद्दा, १० उपसमा* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _या भिक्खुणीची जीवनकथा सुद्धा पहिल्या तिस्सेप्रमाणे आहे, ही भिक्खुणी अर्हतपदास पाप्त झाली. *त्याचप्रमाणे धिरा, विरा, मित्ता, भद्दा, उपसमा आदि पाच भिक्खुणींचे जीवनचरित्र सारखेच आहे.* या सर्व कपिलवस्तूमध्ये राहणार्‍या होत्या. सर्वांचा जन्म शाक्य कुळांत झाला होता. सर्वांनी महापजापती गोतमीकडे प्रव्रज्या घेऊन निब्बाण-साधना केली होती. भगवंतांनी त्यांना उद्देशून म्हटलेल्या गाथा त्या वारंवार उच्चारित असत. म्हणूनच ह्या गाथा त्यांच्या नावावर संग्रहीत झाल्या._ *_तिस्से! तू कल्याणकारी धम्माच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर. क्षणही व्यर्थ जाऊ देऊ नकोस. वेळ व्यर्थ घालविलेले दुर्गतीला प्राप्त होऊन शोक करतात.||५||_* *_धीरा! तू समाधी प्राप्त कर, इंद्रिय ज्ञानाची शांति परम सुख आहे. सर्वश्रेष्ठ आणि महान कल्याणकारक निर्वाणाची आराधना कर. !!६!!_* *_वीरा! तू दृढ साधनेने श्रद्धाद्धी जीवन शक्तींचा विकास केलास. आता तू मार (विकार) आणि त्याच्या सैन्याला पराजित करून अंतिम देह धारण करीत रहा. !!७!!_* *_मित्ता! श्रद्धेने प्रवजित झालेली आहेस. आता तू (सर्व प्राणिमात्राविषयी) मैत्री भावना बाळग आणि सर्वश्रेष्ठ व कल्याणकारक निब्बाणप्राप्तीसाठी कुशल धम्माची भावना कर !!८!!_* *_भद्दा! तू श्रद्धेने प्रवजित झालेली आहेस. आता तू कल्याणकारक धम्मामध्ये लीन हो. आणि सर्वश्रेष्ठ व कल्याणकारक निब्बाणप्राप्तीसाठी कुशल धम्माची भावना कर.!!९!!_* *_उपसमे! तू तरून जाण्यास कठीण असा मृत्युचे लक्ष्य बनलेला (संसार) प्रवाह तरून (पलीकडे) जा. आता तू मार आणि त्याच्या सैन्याला पराजित करून अंतिम देह धारण करीत राहा. !!१०!!_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ : - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *०२/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...