🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_असभ्यतेने हानी_*
*_(नच्चजातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_प्राचीन काळी प्रथम कल्पात चतुष्पद प्राण्यांनी सिंहाला आपला राजा केला. माशांनी आनंद नावावह्या मत्स्याला व पक्षांनी सुवर्णराज हंसाला आपला राजा केले. त्या सुवर्णराजहंसाची एक अत्यंत सुंदर कन्या होती. तिने वडिलांच्या सांगण्यावरून असा वर मागितला की स्वयंवर करून जो पती योग्य वाटेल तो मी वरील. त्याप्रमाणे हंस राजाने हिमालयावर पक्ष्यांचा मोठा समुदाय बोलाविला. एका मोठ्या शिलातलावर सर्व पक्षी गोळा झाले. तेव्हा हंसराजा आपल्या मुलीला म्हणाला, "ह्या पक्षिसंघातून तुला जो नवरा आवडेल तो निवडून काढ." तिने मोराला पसंत केले. तेव्हा सर्व पक्षी त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाले, "तू धन्य आहेस, राजकन्येने एवढ्या पक्षिसंघातून तुझीच निवड केली ह्याबद्दल तुझे आम्ही अभिनंदन करतो."_
_परंतु ह्यावरून माझे सामर्थ्य तुमच्या लक्षात येणार नाही, मला नृत्यकला किती चांगली येते ते पहा, असे म्हणून त्या पक्षीसमुदायासमोर आपला पिसारा फुलवून मोर नाचू लागला, व त्यायोगे नागडा उघडा पडला. सुवर्णराज हंसाला लाज वाटली, व तो म्हणाला, "ह्याचा आवाज फार चांगला, पृष्ठभाग सुंदर, वैडुर्य मण्यासारखी मान आणि लांब पिसारा, परंतु ह्याच्या ह्या निर्लज्ज नाचण्याने माझ्या मुलीशी विवाह करण्यास मी तयार नाही."_
_असे म्हणून त्याने त्याच ठिकाणी दुसऱ्या एका पक्षाशी आपल्या मुलीचा विवाह केला. मोराने अत्यंत लाजून तेथून पलायन केले. *असभ्यतेमुळे चांगले गुण व्यर्थ गेले!*_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*०६/११/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment