🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_कुसंगतीचे फळ_*
*_(महिलामुख जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_वाराणसीराजाच्या महिलामुख नावाचा एक मंगल हत्ती होता. राजाचे त्याच्यावर खूप प्रेम होते. एके रात्री त्याच्या हस्तिशाळेजवळ मध्यरात्रीच्या सुमारास काही चोर येऊन दरोडा टाकण्यासाठी चर्चा मसलत करत होते, त्या चर्चेत ते असे म्हणत की कोणतीही दया माया न दाखवता, जो कोणी पुढे येईल त्याला ठार मारून दरोडा टाकायचा आणि त्या रात्री त्यांनी दरोडा टाकला. त्या चोरांच्या मनात असा विचार आला की, दरोडा टाकण्यापूर्वी चर्चा मसलत करण्यासाठी ही जागा योग्य असून यापुढे हितेच दरोडा टाकण्यापूर्वी आपण हिते येऊन चर्चा मसलत करू. ते वारंवार त्या ठिकाणी येऊ लागले पण त्याचा महिलामुख हत्तीवर इतका वाईट परिणाम झाला की, त्याच्या अंतःकरणातील प्रेमाचा - दयेचा अंश आटून जाऊन त्याने प्रथम जवळ आलेल्या आपल्या माहुताला ठार मारले._
_महिलामुख पिसाळला ही बातमी राजाला कळविण्यात आले. त्या वेळी आमचा बोधिसत्त्व राजाचा एक अमात्य होता. राजा त्याला म्हणाला, "हस्तिशाळेत जाऊन मंगल हत्तीच्या वेडाचे खरे कारण शोधून काढ. इतका चांगला हत्ती एकाएकी वेडावला हे कसे झाले?"_
_बोधिसत्त्वाने हस्तिशाळेत जाऊन महिलामुखाला नीट तपासून पाहिले, परंतु त्याच्या शरीरावर काही जखम झाल्याचे त्याला दिसून आले नाही. तेव्हा बोधिसत्त्वाने आसपासची जागा तपासून पाहिली. एका कोपऱ्यात दरोडा टाकण्याची काही हत्यारे आणि चोरांनी टाकून दिलेल्या काही वस्तू त्याच्या पाहण्यात आल्या. तेव्हा *चोरांच्या मसळती ऐकून हा हत्ती बिघडून गेला* असावा अशी त्याची खात्री झाली; आणि राजाजवळ जाऊन तो म्हणाला, "महाराज! महिलामुखाला दुसरा कोणताही रोग झाला नाही. *त्याच्या जवळपास चोरांनी चालविलेल्या मसलती ऐकून त्याचे मन बिघडून गेले आहे व तो उन्मत्त झाला आहे! दुष्ट संगतीचे हे फळ आहे!"*_
_राजाने यावर काही उपाय आहे काय अशी विचारणा बोधिसत्त्वाला केली असता बोधिसत्त्व म्हणाला, "महाराज! याला सोप्पा उपाय आहे. सुशील साधुसंतांना बोलावून त्याच्या शाळेत धर्माविषयी संभाषण करण्यास सांगावे. म्हणजे तो आपोआप सुधारेल._
_राजाने वाराणसीच्या आसपास राहणाऱ्या काही साधुसंतांना आमंत्रण करून हस्तिशाळेत धार्मिक संभाषण करण्यास विनंती केली. त्यांनी तेथे बसून *मनुष्याने शीलवान व्हावे, शांती धरावी, परोपकार करावा, दया वाढवावी* इत्यादी गोष्टींची चर्चा केली. ती ऐकून हत्तीचा मद जागच्याजागी निवाळला; व तो पूर्वीपेक्षाही सौम्य झाला!_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*०४/११/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment