🌼🌿☘️🌼🌿☘️🌼🌿☘️🌼🌿
*_सदाचरण_*
_शारीरिक सदाचरण तीन प्रकारचे, वाणीचे चार प्रकारचे आणि मनाचे तीन प्रकारचे आहेत._
*_शारीरिक सदाचरण म्हणजे :-_*
*१)* जीवहिंसा व प्राणीहिंसा यांचा त्याग करून प्रत्येक प्राणीमात्रावर अनुकंपा करणे
*२)* चोरीपासून विरत राहून प्रामाणिकपणे उपजीविका करणे
*३)* मिथ्याचारापासून दूर राहणे
*_वाणीचे सदाचरण म्हणजे : -_*
*१)* असत्य बोलणे, सर्वथा सोडून देणे
*२)* चुगल्या न करता, भांडणे न लावता ऐक्य निर्माण करणे, प्रेम व आनंद निर्माण करणे
*३)* कटुवचन न बोलता सर्वांना प्रिय व आनंददायी असेच बोलणे
*४)* व्यर्थ बडबड न करता, समयानुकूल व हितकर असेच बोलणे
*_मनाचे सदाचरण म्हणजे :-_*
*१)* निर्लोभी असणे व परधन आपले व्हावे अशी हाव कधीच न धरणे
*२)* आपल्या मनात द्वेषाला थारा न देणे
*३)* आपली दृष्टी सम्यक आणि संकल्प प्रमादरहित ठेवणे.
*_भगवान बुद्धांच्या उपदेशानुसार सदाचरणाचा अर्थ असा आहे._*
*संदर्भ :- The Buddha & His Dhamma*
*बौद्ध धम्म जिज्ञासा*
*संकलन : महेश कांबळे*
*०४/१०/२०२०*
🌼🌿☘️🌼🌿☘️🌼🌿☘️🌼🌿
No comments:
Post a Comment