Thursday, 28 May 2020

भदंत डॉ आनंद कौसल्यायन

 🌹 *बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्खु-भिक्षुनी-उपासक-उपासिका* 🌹
 
*भदंत डॉ आनंद कौसल्यायन*



 
वंदनीय भदंत डॉ. आनंद कौसल्यायन (५ जानेवारी १९०५ - २२ जून १९८८) हे बौद्ध भिक्खू, विद्वान, प्रवासी आणि भारतातील विपुल लेखक होते. २० व्या शतकाच्या बौद्ध धम्माच्या उन्नतीसाठी महान कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून त्यांना मानले जाते. त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. 

भदंत आनंद कौसल्यायन - (हरनाम दास) यांचा जन्म ५ जानेवारी १९०५ रोजी पंजाबमधील अंबाला जिल्ह्यातील सोहाना गावात झाला. त्यांनी लाहोरमधील नॅशनल कॉलेजमधून बीए केले. बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी त्यांनी जगाच्या विविध भागात प्रवास करीत बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार केला. बौद्ध धम्माच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.


*"धम्मदायादा मे, भिक्खवे ,मा आमिसदायदा।"*
          _भिक्षूंनो ! माझ्या ( कालातीत) धम्माचे दायाद व्हा, ( कालबाह्य ) नाही!_
          
‌            *_विसाव्या शतकात जे बौद्ध धम्माचे विद्वान होऊन गेले त्यात भदंत डॉ आनंद कौसल्यायन यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल._* अगदी तरुणपणी (१८ वर्षांचे असताना) त्यांनी प्रव्रज्या घेतली व हिंदी भाषेचा सखोल अभ्यास करून बौद्ध संस्कृतीचे माहेरघर असलेल्या श्रीलंकेमध्ये जाऊन तेथील विद्यापीठांत हिंदी प्रमुख म्हणून बरीच वर्षे कार्य केले. बुद्ध ,आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचे भाष्यकार आणि अभ्यासक म्हणून त्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्याचप्रमाणे *बौद्ध धम्माचा आंबेडकरवादी प्रचारक म्हणून त्यांनी केलेले कार्य देखील महत्वपुर्ण आहे.* आपले सर्व पांडित्य पणाला लावून त्यांनी लिहिलेली ७० हुन अधिक पुस्तके ही बौद्ध साहित्याला समृद्ध करणारी देणगी आहे. *बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य आणि तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहचावे यासाठी त्यांनी उत्तरार्धात अखंड परिश्रम केले.* त्यांचे पाली भाषेवरील प्रभुत्व विलक्षण होते. त्याचं बळावर त्यांनी पाली त्रिपिटकांच्या हिंदी भाषांतरात मोलाची भूमिका बजावली. याशिवाय त्यांनी पाली महाव्याकरण इ. पुस्तके लिहिली. *चीन, जपान,जर्मनी, थायलंड, म्यानमार, श्रीलंका इ देशांत भ्रमंती करून मिळवलेल्या बौद्ध धम्माच्या ज्ञानातुन "अंगुत्तर निकाय ", "जातक, बौद्ध धर्म और मार्क्सवाद ",  "क्रांती के अग्रदूत भगवान बुद्ध ", "बौद्ध धर्म का बुद्धीवादी अध्यायन " इ .बौद्ध धम्मावरील अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले. याशिवाय बाबासाहेबानी लिहिलेल्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म " , "एनिहिलेशन ऑफ कास्ट ", "रिडल्स इन हिंदुइझम " इ. ग्रंथाचा हिंदी अनुवाद केला.*
          _महापंडित राहुल संकृत्यायन यांचे शिष्य असलेंल्या_ आंनद कौसल्यायन यांनी संस्कृत , पाली, इंग्रजी, मराठी,हिंदी, पंजाबी, उर्दू,इ भाषांवर प्रभुत्व मिळवले होते. त्यांनी लिहिलेले बाबासाहेबांचे चरित्र " यदि बाबा न होते " या नावाने प्रसिद्ध आहे. बाबासाहेबांची प्रस्तावना असलेले "एस्सेन्स ऑफ बुद्धीझम" हे पी लक्ष्मी नरसु यांचे पुस्तक देखील त्यांनी अनुवादित केले होते. " बुद्धिझम फॉर एवरीबडी," "दि बुद्धिस्ट आउटलूक" हे त्यांचे इंग्रजी ग्रंथ. वेद से मार्क्स हा आणखी एक महत्वपूर्ण ग्रंथ! भगवान बुद्ध बडे भाई है तो मार्क्स छोटे भाई असे ते म्हणत! बौद्धांनी कर्मकांडमुक्त जीवन जगावे यासाठी त्यांनी बौद्ध जीवन पद्धती हे पुस्तक लिहिले.त्यानीं सर्वसामान्य लोकांना समजावी म्हणून सुलभ आणि छोटेखानी पुस्तकेही लिहिली.  १९७० साली भारतीय भिक्खू संघाची स्थापना आणि १९७४ ला सारनाथ ला आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राची स्थापना ही त्यांची प्रमुख संघटनात्मक कार्ये. ते सलग १३ वर्षे वर्ध्याच्या राष्ट्रभाषा प्रचार समितीवर प्रमुख होते.
        *_बाबासाहेबांचे परिनिर्वाण झाल्यावर मुंबईस झालेल्या ०७ डिसेंबर १९५६ च्या अंत्ययात्रेमध्ये ते प्रमुख भिक्खु होते. त्यानंतर भारतात परत येऊन नागपूरच्या दीक्षाभूमीवर स्थायिकपणे राहून बौद्धांचे मार्गदर्शन केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या "The Buddha & His Dhamma"  या पुस्तकाचे हिंदी भाषांतर करून बौद्ध वाङ्मयातुन बाबासाहेबांनी घेतलेलं स्रोत हुडकून काढून त्यांचे टिप्पण केले. २२ जून १९८८  ला या महत्तम बौद्ध महापंडितांचे निधन झाले. आधुनिक वैज्ञानिक जगास बौद्धधम्माचा दृष्टिकोन कशा प्रकारे तंतोतंत लागू होतो, याबद्दल त्यांनी जनजागृतीचे महत्कार्य केले._*

*_वंदनीय भदंत डॉ आनंद कौसल्यायन ह्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन !_*

*महेश कांबळे*
*मुंबई*
https://mikamblemahesh.blogspot.com/2020/05/blog-post_69.html
💐💐💐🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...