Monday, 2 March 2020


संघ वंदना

सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो
,
उजुपतिपन्नो भगवतो सावकसंघो
,
ञायपटिपन्नो भगवतो सावकसंघो
,
सामीचपटिपन्नो भगवतो सावकसंघो।
यदिदं चत्तारि पुरिसयुगानी, अठ्ठपुरिसपुग्गला
एस भगवतो सावकसंघो
, आहुनेय्यो, पाहुनेय्यो, दक्खिनेय्यो, अञ्जलिकरणीयो, अनुत्तरं पुञ्ञक्खेतं लोकस्सा’ति॥
संघं जीवित परियन्तं सरणं गच्छामि।
ये च संघा अतीता च
, ये संघा अनागता।
पच्चुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सब्बदा
।।१।।

भगवन्ताचा शिष्यसंघ सन्मार्गावर आरुढ आहे .
भगवन्ताचा शिष्यसंघ सरळ मार्गावर आरुढ आहे.
भगवन्ताचा शिष्यसंघ ज्ञानाच्या मार्गावर आरुढ आहे .
भगवन्ताचा शिष्यसंघ उत्तम मार्गावर आरुढ आहे.
भगवन्ताचा शिष्यसंघ अशा नर रत्नांचा आहे की ज्याने चार जोड्या अशा आठ सप्तपदाची प्राप्ती करुन घेतली आहे , हा संघ निमंत्रण देण्यास योग्य , स्वागत करण्यास योग्य , दान देण्यास पात्र , तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे . असा हा संघ वंदन करण्यास योग्य आहे. मी जन्मभर असा संघाचे अनुकरण करीत आहे .  

असा जो भूतकाळातील , भविष्य काळातील व हल्लीही असलेला भगवान बुद्धांचा श्रावक संघ आहे . त्या सर्वांना मी सदैव वन्दन करतो / करते ।।१।।

नत्थि मे सरणं अञ्ञं, संघो मे सरणं वरं।
एतेन सच्चवज्जेन
, होतु मे जयमङगलं ।।२।।

मला दुसऱ्‍या कशाचाही सरणस्थान नाही . बुद्धाचा शिष्य संघच माझा सर्वश्रेष्ठ सरणस्थान आहे , ह्या सत्वचनाने माझे जयमंगल होवो ।।२।।

उत्तमङ्गेन, वन्देहं, संघ ञ्च तिविधुत्तमं।
संघे यो खलितो दोसो
, संघो खमतु तं ममं ।।३।।

तिन्ही प्रकारानी श्रेष्ठ असलेल्या ह्या संघाला मी मस्तक वाकवून प्रणाम करतो / करते . संघ संबंधी जर माझ्याकडून काही दोष घडला असेल तर संघ त्याबद्दल क्षमा करो. ।।३।।

यं किय्चि रतनं लोके, विज्जती विविधा पुथु ।
रतनं संघसमं नत्थि, तस्मा सोत्थि भवंतू मे । ।४ । ।

ह्या जगात निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्ने आहेत, त्यापैकि एकानेही बौद्ध संघाची बरोबरी होणार नाही.  या सत्य वचनाने माझे कल्याण होवो । ।४ । ।
 

सङ्घो विसुद्धो वर दक्खिनेय्यो, सन्तिद्रियो सब्बमलप्पहिनो
गुणेहि नेकेहि समाद्धिपतो
, अनासवो तं प नमामी संघ ।।५।।

संघ विशुद्ध , श्रेष्ठ , दान देण्यास योग्य , शान्त इन्द्रियांचा , सर्व प्रकारच्या मलांपासून, दोषांपासुन अलिप्त , अनेक गुणांनी युक्त तसाच निष्कलंक आहे. अश्या संघाला मी प्रणाम करतो / करते. ।।५।।

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...