Thursday, 19 March 2020

*कलाप*

ज्या कणाला पुन्हा विभाजीत करता येत नाही अश्या कणांना भगवान बुध्दांनी 'कलाप' असे म्हटले आहे. कलाप एकसंघ नसून तो समूह असतो. तो एक घन कण नसतो, तो तरंगाचा पुंजका असतो. जी कोणतीही घनवस्तू दिसते ती असंख्य कलापांचा केवळ एक पुंजका असतो. प्रत्येक कलापामध्ये सुध्दा पोकळी असते. ते एकास एक भिडलेले नसतात. सर्व तरंगाशिवाय काहीही नसते. अलिकडेच शास्त्रज्ञांनी हिग्स बोसान ह्या मूलभूत कणाचा शोध लावला. ह्या कणाला मूलभूत अश्यासाठी म्हटले गेले आहे की ह्या कणापासूनच सृष्टीची उत्पत्ती झालेय असे शास्त्रज्ञांचे मत आहे. बुध्द ही 'रूप' हे अठ्ठकलापा पासून बनले आहे असे सांगतात. कारण कोणत्याही घन वस्तूच्या उत्पत्तीचा पहिला टप्पा हा हिग्स बोसोन असतो. 

भौतिक सत्य बदलत असते याची अनुभूति भगवान बुध्दांनी स्वनिरिक्षण करित असतांना घेतली. आपल्या मनाच्या तीक्ष्ण एकाग्रतेने बुध्दांनी आपल्या मनाचा तळ गाठला. त्यात त्यांना असे आढळले की, आपले शरीर हे लहान लहान कलापांचे बनलेले आहे. ते कलाप सारखे उत्पन्न व नष्ट होतात. हाताची चुटकी वाजेपर्यत किंवा डोळ्यांची पापणी लवेपर्यंत त्यातील प्रत्येक कलाप शत सहस्त्र कोटी इतक्या वेळा जन्मतो व मृत्यू पावतो असे त्यांना आढळले. 
नोबेल पुरस्कार विजेते डॉ. लुईस वॉल्टर अल्वारेस यांनी Bubble Chamber यंत्र बनवून परमाणू पेक्षाही सूक्ष्म कणांची ( Subatomic Particle ) उत्पत्ती व लय यांची मोजणी केली. आणि एका सेकंदात एकावर बावीस शून्य इतक्या वेळा उदय व लय पावतो हे दाखवून दिले. 
भगवान बुध्दांनी शोधलेले सत्य व त्या शास्त्रज्ञाने शोधलेले सत्य अगदी तंतोतंत बरोबर जुळते. 

आपले 'रूप' हे अठ्ठकलापाने बनलेले असते. अठ्ठकलाप हे चार महाभूत व त्यांच्या गुणधर्माचा समुच्चय असतो. ते एक दुसऱ्याहून अलग होऊ शकत नाही. तरीसुध्दा त्यांच्यामध्ये परस्पर पोकळी असते. आईनस्टाईनच्या Theory of Relativity या सिध्दांन्तानुसार जड वस्तू, शक्ती, आकाश, ऊर्जा आणि काळ यांच्यामध्ये परस्पर संबंध आहे. त्याच्यानुसार आकाश ( Space ) केवळ त्रिपरिमाण ( Three Dimensional ) नाही आणि काळाचे स्वतंत्र अस्तित्व नाही. दोहींचा परस्पर संबंध आहे. म्हणून ते चार परिमाण  ( Four Dimensional ) मध्ये एकमेकाशी निगडीत आहेत. या सिध्दांन्तानुसार जड वस्तू ( Mass ) ही केवळ एका शक्तिरूपाने विद्यमान आहे. एक स्थिर वस्तू स्वत:च  शक्तीचा ( ऊर्जेचा ) संचय आहे. त्याचा सिध्दांत येणेप्रमाणे ( E= mc2, E = energy, M = mass, C= speed of light ) याचाच अर्थ असा की कोणतीही वस्तू ही स्वत: च्या प्रकंपनामुळे असतो. भगवंतांनी म्हटलेच आहे की या विश्वातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक कलाप केवळ प्रकंप मात्र आहेत. प्रवाह मात्र आहेत. Quantum Theory या शोधामुळे ही गोष्ट प्रकट झालेली आहे की, एकच लघुकण एकाच वेळी दोन रूप धारण करत असतो. एक कण ( Particle ) रूप आणि दुसरे तरंगरूप  ( Wave ).
बुध्दांनी या गोष्टीचा शोध घेतला की प्रत्येक कलाप अत्यंत तीव्र गतीने प्रकंपित होतो, बदलतो आणि त्याची उत्पत्ती व लय होतो.  आज आधुनिक वैज्ञानिकांसुध्दा तसल्याच प्रचंड गतीचा शोध लावलाय. 

सब्बो पज्जलितो लोको।
सब्बो लोको पकम्पितो।

सर्व सृष्टी जळत आहे. 
सर्व सृष्टी प्रकंपित होत आहे. 

- संयुक्त निकाय - भिक्खुणीसंयुक्त - उपचाला सुत्त 

रूप, कलाप यांचे संदर्भ - अभिधम्मत्थसंग्ड्हो
 
संकलित माहती
 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...